आमचा निकाल कधी लावता? २५ लाख बेरोजगारांचा प्रश्न

By दीपक भातुसे | Published: November 22, 2023 11:15 AM2023-11-22T11:15:02+5:302023-11-22T11:15:26+5:30

शासकीय भरतीतील सहा विभागांच्या परीक्षांचे निकाल अजूनही रखडले

When do you release our results? Question of 25 lakh unemployed | आमचा निकाल कधी लावता? २५ लाख बेरोजगारांचा प्रश्न

आमचा निकाल कधी लावता? २५ लाख बेरोजगारांचा प्रश्न

दीपक भातुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाने १५ ॲागस्ट २०२३ पर्यंत राज्यात ७५ हजार शासकीय पदांची भरती करण्याची घोषणा केल्यानंतर काही विभागांनी उशिरा का होईना भरती परीक्षेच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. या विभागांच्या सरळसेवा भरतीच्या परीक्षाही पार पडल्या. मात्र या परीक्षा होऊन तीन ते चार महिने उलटूनही अद्याप निकाल लागलेले नाहीत. राज्यात जुलै ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सहा विभागांच्या परीक्षा पार पडल्या. मात्र, आता नोव्हेंबर संपत आला तरी या परीक्षांचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे परीक्षा देऊन शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले लाखो तरुणांमध्ये संतापाचीभावना आहे. 

राज्यात आधीच शासकीय नोकरभरतीच्या परीक्षा विलंबाने झाल्या. या परीक्षांची तयारी करणारे तरुण आधी या परीक्षांच्या जाहिरातींची वाट बघत होते. आता निकाल कधी येणार याची प्रतीक्षा करीत आहेत. 

तलाठी पदासाठी ११ लाख अर्ज
तलाठी पदासाठी तब्बल ११ लाख अर्ज आले होते, तर वनविभागाच्या परीक्षेसाठी साडेपाच लाख अर्ज आले होते. उर्वरित परीक्षांसाठीही लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामुळे या सहाही विभागांच्या परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा आकडा २५ लाखांच्या पुढे आहे.

सरळसेवा परीक्षेच्या अनेक विभागांचे पेपर फुटले आहेत. यावर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लवकरच सुनावणी सुरू होईल. तलाठी व वन विभाग भरती परीक्षेत गैरप्रकार घडला आहे. हे निकाल राखीव ठेवून इतर निकाल लवकर जाहीर करण्यात यावेत.
- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

कोणत्या परीक्षांचे निकाल रखडले
nतलाठी पदासाठी ॲागस्ट आणि सप्टेंबरमध्ये परीक्षा पार पडली.
nपशुसंवर्धन, सहकार विभागाची सप्टेंबरमध्ये 
nवन विभागाची ३१ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान  तसेच अर्थ सांख्यिकी आणि कृषी विभागाच्याही परीक्षा झाल्या असून त्याचे निकालही रखडले आहेत.

Web Title: When do you release our results? Question of 25 lakh unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.