पाणी दिले की, तोंडचे पळवले; अर्थसंकल्पातून जलसंवर्धनाचा पालिकेला विसर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 09:44 AM2024-02-04T09:44:32+5:302024-02-04T09:45:32+5:30

गळतीपासून पाणीचोरीपर्यंत तसेच जलसंवर्धनाचा पालिकेला विसर?

When water is given, the mouth runs; Forget about water conservation from the budget | पाणी दिले की, तोंडचे पळवले; अर्थसंकल्पातून जलसंवर्धनाचा पालिकेला विसर

पाणी दिले की, तोंडचे पळवले; अर्थसंकल्पातून जलसंवर्धनाचा पालिकेला विसर

सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोठा गाजावाजा करत महापालिकेने यंदाचा ५९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. प्रत्यक्षात मात्र मुंबईकरांनापाणीचपाणी देण्याचा निर्धार करताना ज्यांना पाणी मिळत नाही; अशांसाठी अर्थसंकल्पात ठोस अशा काहीच तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. पाणीगळतीपासून पाणीचोरीपर्यंत आणि जलसंवर्धनाचा पालिकेला कदाचित विसर पडला आहे की काय? अशी प्रचिती अर्थसंकल्पातून दिसून येते आहे.

मुंबईकरांना शेकडो किलोमीटर लांब असलेल्या तलांवातून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईत पाणी आणण्यासाठीच्या जलबोगद्यांसह जलशयांच्या कामांना अर्थसंकल्पात प्राधान्य दिले आहे. यातील बहुतांशी कामे याच वर्षी पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करीत गोवंडी, चेंबूरसह मध्य मुंबईतला पाणीपुरवठा सुरळीत होईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्षात मालाड, मालवणी, संतोषनगर, गोवंडी, मानखुर्द, कुर्ल्यासह कित्येक वस्त्या अशा आहेत जेथे आजही मुंबईकरांना पाण्याचे टेन्शन आहे. गोवंडी, मानखुर्दमधल्या वस्त्यांना तर पाणी विकत घ्यावे लागत आहे. पंधरा-पंधरा वर्षे भांडल्यानंतर हक्काचे पाणी मिळत आहे. मालाड, मालवणीसह मुंबईत असे कित्येक डोंगराळ भाग आहेत जेथे पाण्याचा दाब नाही. पहिल्या मजल्यावरसुद्धा मोटार लावल्याशिवाय पाणी येत नाही. 

पाणी हक्क समितीने जिथे पाणी मिळत नाही तिथे पाणी मिळावे म्हणून लढा देत पाणी मिळवून दिले आहे. पाण्याचा लढा येथेच थांबत नाही. पाण्याचे वाटप समान हवे, हा मुद्दा आहे.

मा. नगरसेवक पाणीप्रश्नी गप्प?
जलसंवर्धनासाठी विहिरी, रेन हार्वेस्टिंग प्रकल्पांकरिता फार काही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. मुळातच मुंबईच्या प्रश्नांवर बोलणारे नगरसेवक, पाण्यावर बोलणारे लोकप्रतिनिधी पालिका गाजवून सोडत होते. मात्र, सध्याच्या प्रशासकीय राजवटीमध्ये माजी नगरसेवकांनाही पाण्यासारख्या प्रश्नावर बोलावेसे वाटू नये हीदेखील शोकांतिका असल्याचे चित्र आहे.

गळतीतून लाखो लिटर पाणी वाया
  पाणीचोरी आणि पाणीगळती कमी झाली आहे, असा दावा कित्येक वेळा पालिकेने केला असला तरी झोपड्यांमध्ये गळती आणि चोरीचे प्रमाण अधिक आहे. 
  मोठ्या जलवाहिन्यांच्या गळतीतून लाखो लिटर पाणी वाया जाते आहे. ‘मागेल त्याला पाणी’ अशा घोषणा करताना किंवा सर्वांसाठी पाणी धोरण आखताना कित्येकांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे.

Web Title: When water is given, the mouth runs; Forget about water conservation from the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.