रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी दिलीत, बरंच आहे, पण...; मनसेचा ठाकरे सरकारला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 09:24 AM2021-08-09T09:24:12+5:302021-08-09T09:24:49+5:30

प्रश्न हा आहे की दिव्यापासून थेट बदलापूरपर्यंत रोजच्या रोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या १५ ते २० लाख प्रवाशांचं लसीकरण कधी होणार? कासवगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने ह्या सगळ्यांचं लसीकरण व्हायला किमान एक वर्ष तरी लागेल.

When will the 15 to 20 lakh commuters traveling daily from Diva to Badlapur be vaccinated asked MNS MLA Raju Patil | रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी दिलीत, बरंच आहे, पण...; मनसेचा ठाकरे सरकारला थेट सवाल

रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी दिलीत, बरंच आहे, पण...; मनसेचा ठाकरे सरकारला थेट सवाल

googlenewsNext

मुंबई- राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. यामुळे आता राज्यातील ठाकरे सरकारने काही जिल्ह्यांत, काही प्रमाणावर निर्बंध शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना, मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी (दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना) 15 ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे. यानंतर, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी ठाकरे सरकारला थेट सवाल केले आहेत. (When will the 15 to 20 lakh commuters traveling daily from Diva to Badlapur be vaccinated asked MNS MLA Raju Patil)

...त्या  १५ ते २० लाख प्रवाशांचं लसीकरण कधी होणार?
पाटील म्हणाले "रेल्वे प्रवासासाठी दोन डोस झालेल्यांना सशर्त का होईना परवानगी दिलीत बरंच आहे. प्रश्न हा आहे की दिव्यापासून थेट बदलापूरपर्यंत रोजच्या रोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या १५ ते २० लाख प्रवाशांचं लसीकरण कधी होणार? कासवगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने ह्या सगळ्यांचं लसीकरण व्हायला किमान एक वर्ष तरी लागेल. त्यांनी रोजीरोटीसाठी प्रवास कधी करायचा? की त्यांना कायमच गृहीत धरणार आहात?  रेल्वेप्रवास हा दळणवळणाचा एकमेव पर्याय असलेल्यांनी जगण्यासाठी कुठला पर्याय निवडायचा? लसीकरणाचा वेग वाढवा. जगणं सुकर होऊ द्यात. ही जबाबदारी नव्हे आपलं कर्तव्य आहे. पर्याय द्या," असे महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे आमदार प्रमोद पाटील यांनी म्हटले आहे.

'आता आणखी एक दणका द्यावा लागेल'; भाजपाचा ठाकरे सरकारला इशारा

... तर पुन्हा लॉकडाऊन -
कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. तिसरी लाट येत असल्याचे जाणवल्यास राज्यातील ऑक्सिजन, बेडची उलब्धता आणि रुग्णवाढीचा कालावधी लक्षात घेऊन वेळीच पुन्हा एकदा लाॅकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

एक-दोन दिवसांत विशेष ॲप -
एक-दोन दिवसांत विशेष ॲप सर्वांसाठी खुले होईल. या ॲपमध्ये दोन्ही लस घेतल्याची माहिती भरल्यानंतर प्रवासासंदर्भात कार्ड दिले जाईल आणि त्यानुसार प्रवास करता येईल. सर्व खबरदारी घेत हे निर्बंध हटवण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. 
 

Web Title: When will the 15 to 20 lakh commuters traveling daily from Diva to Badlapur be vaccinated asked MNS MLA Raju Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.