मुंबई : लोकल प्रवास जीवघेणा झाला आहे. वाढते अपघात रोखण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाने लोकलच्या दरवाजाच्या वरील बाजूस ‘निळा दिवा’ बसविला आहे. याद्वारे लोकल सुरू झाल्यावर निळा दिवा पेटणार आहे. ही सेवा पश्चिम रेल्वेवर कधी येणार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
मुंबई उपनगरीय लोकलवर प्रवाशांचा भार वाढला आहे. यामुळे अनेक अपघात होत आहेत. यामध्ये चालत्या गाडीतून अनेक प्रवासी फलाटामध्ये अडकून पडतात. असे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल दरवाज्यावर निळा रंगाचा लुकलुकणारा सेफ्टी सेन्सर लावून प्रवाशांना लोकल सुरू झाल्याची सूचना देणार आहे. मात्र ही सुविधा पश्चिम रेल्वेवर येण्यास विलंब लागणार असल्याचे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
निळा दिव्यांचा प्रकल्प मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी बनविला आहे. त्यामुळे पहिल्यांदा मध्य रेल्वेवर या प्रकल्पाचे अनावरण झाले. रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वे प्रशासनाला सूचना दिल्यास हा प्रकल्प पश्चिम रेल्वेवर ही राबवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.पश्चिम रेल्वेचे मुख्य वरिष्ठ अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि अपघात टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलला निळा दिवाचा प्रकल्प नियोजनात आहे.मध्य रेल्वेवरील सर्व लोकलवर लागणार निळा दिवाच्निळा दिव्यांची चाचणी एका लोकलवर करण्यात आली आहे. यासंदर्भातील पडताळणी सुरू असून लवकर सर्व लोकलवर ‘सेफ्टी सेन्सर ब्लू लाईट’ पेटणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार जैन यांनी सांगितले.प्रवाशांकडून स्वागतवाढत्या रेल्वे अपघातावर रेल्वे प्रशासन म्हणते की, रेल्वे चालविणे हीच आमची जबाबदारी आहे. रेल्वेच्या अपघातात स्वत:ला दोषी धरत नव्हते. मात्र आता रेल्वे प्रशासनाने अपघाताची जबाबदारी न झटकता उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने निळा दिवा बसविण्याची कल्पना उत्तम असून हे योग्य पाऊल उचलले आहे, असे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने सेफ्टी ब्लू लाईट प्रकल्प लवकर अंमलात आणणार आहे. रेल्वे प्रशासनाकडे यासंदर्भात चर्चा सुरू आहे.- सुनील कुमार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक,पश्चिम रेल्वे