घरेलू कामगारांना पॅकेज कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:51+5:302021-05-05T04:09:51+5:30

सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेचा सवाल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारने १३ एप्रिल रोजी समाजातील दुर्बल घटकांसाठी ...

When will domestic workers get the package? | घरेलू कामगारांना पॅकेज कधी मिळणार?

घरेलू कामगारांना पॅकेज कधी मिळणार?

Next

सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारने १३ एप्रिल रोजी समाजातील दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचा लाभ राज्यातील सर्व घरेलू कामगारांना मिळावा यासाठी सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात विविध मुद्दे मांडले. त्यानुसार या आर्थिक मदतीची घोषणा करताना हा लाभ केवळ नोंदणीकृत घरेलू कामगारांना मिळेल, असे जाहीर करण्यात आले. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, मंडळ स्थापन केल्यानंतर ते सक्रिय ठेवण्यासाठी मनुष्यबळ नेमले गेले नाही. परिणामी नोंदणी आणि नूतनीकरण संथ गतीने होत राहिले. वारंवार त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले. या घरेलू कामगारांना पॅकेज कधी मिळणार, असा सवाल सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेने केला आहे.

मध्यंतरी झालेल्या निवडणुका आणि कोरोनामुळे कामात खंड पडत गेला. लाभ नोंदीत घरेलू कामगारांपर्यंत ठेवल्याने मोठ्या संख्येने घरेलू कामगार लाभापासून वंचित राहिल्या. परिणामी मंडळ स्थापन झाल्यापासून ज्या घरेलू कामगारांनी मंडळाकडे नोंद केली असेल त्या प्रत्येक कामगाराला हा लाभ मिळावा, असे संघटनेचे अध्यक्ष सुभाष मराठे निमगावकर यांचे म्हणणे आहे. जे घरेलू कामगार नोंदणीकृत संघटनेचे सदस्य आहेत आणि जे त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि मालकांचे प्रमाणपत्र सादर करतील त्या सर्वांना हा लाभ द्यावा. याशिवाय नोंदणीची प्रक्रिया वेगवान करावी. नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी करावी. ओळखपत्र द्यावे. मंडळाकडे सर्व तपशील संगणकीकृत असावा. प्रत्येकी तीन वर्षांनी नूतनीकरण करावे, असे मतही निमगावकर यांनी मांडले आहे.

......................................

Web Title: When will domestic workers get the package?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.