अग्निकांडाची मालिका थांबणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 07:16 AM2018-01-06T07:16:45+5:302018-01-06T07:17:26+5:30

साकीनाका येथील फरसाण मार्टची आग, कमला मिल कम्पाउंड येथील आग, अंधेरी येथील इमारतीला लागलेली आग आणि शुक्रवारी नागपाडा येथील जिया इमारतीला लागलेली आग; अशा आगीच्या सलग घटनांनी मुंबई शहर आणि उपनगर होरपळून निघाले आहे. मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे.

 When will the firecracker series stop? | अग्निकांडाची मालिका थांबणार कधी ?

अग्निकांडाची मालिका थांबणार कधी ?

Next

- अक्षय चोरगे 
मुंबई  - साकीनाका येथील फरसाण मार्टची आग, कमला मिल कम्पाउंड येथील आग, अंधेरी येथील इमारतीला लागलेली आग आणि शुक्रवारी नागपाडा येथील जिया इमारतीला लागलेली आग; अशा आगीच्या सलग घटनांनी मुंबई शहर आणि उपनगर होरपळून निघाले आहे. मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या या घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे. आगीच्या घटनांनंतर झालेली कारवाई ही तात्पुरत्या स्वरूपाची असून, यावर ठोस उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. अशाच काहीशा आगीच्या तोंडावर असलेल्या मुंबईत नक्की काय खबरादारी घेतली पाहिजे; याचा आढावा यानिमित्ताने घेण्यात येत आहे.
कमला मिल कम्पाउंडमधील हॉटेलमध्ये आग लागण्याची दुर्घटना घडल्यानंतर पालिका आणि अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अग्निशमन दलाकडून सुरुवातीला हॉटेल, इमारती आणि कार्यालयांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर त्याचे नूतनीकरण करणे, नूतनीकरण न केलेल्या हॉटेल आणि इमारतींवर कारवाई करणे, त्याची तपासणी
करणे ही संपूर्ण जबाबदारी पालिकेकडे आहे.
परंतु मागील काही आगीच्या दुर्घटनांवरून ही जबाबदारी पेलण्यात पालिका अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून अग्निशमन दल ना हरकत प्रमाणपत्र, त्याचे नूतनीकरण, तपासणी यासाठी स्वतंत्र सेल तयार करणार आहे.

दंड नव्हे, परवाना रद्द
ना हरकत प्रमाणपत्र तयार करणे, त्याचे नूतनीकरण करणे व त्याची तपासणी करणे यासाठी अग्निशमन दल नवा विभाग तयार करणार आहे. या विभागामध्ये ५० अधिकारी व ५० ते ६० कर्मचारी असण्याची शक्यता आहे. या सेलमधील अधिकारी ज्या हॉटेल, कार्यालयांमध्ये अपुरी फायर फायटिंग सिस्टिम, ना हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण केलेले नसेल अशा हॉटेल आणि कार्यालयांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता थेट परवाना रद्द करू शकतात.

‘ब’ अर्जाची पूर्तता आवश्यक
अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जो अर्ज केला जातो, त्या अर्जाला ‘बी फॉर्म’ म्हटले जाते. या अर्जात अग्निशामक, अग्निप्रतिबंधक यंत्रणेबाबतची माहिती आणि पूर्ततेबाबतचे पुरावे अग्निशमन विभागाकडे सुपुर्द करावे लागतात. त्यानंतरच अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.

प्रमाणपत्र नूतनीकरण गरजेचे
ना हरकत प्रमाणपत्राचे दरवर्षी नूतनीकरण करणे गरजेचे आहे. परंतु असंख्य हॉटेल्स, कार्यालये या प्रमाणत्राचे नूतनीकरण करत नाहीत. अग्निशमन विभागाकडून त्याबाबत कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नाही. तपासणी करण्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेची असते. परंतु ना हरकत प्रमाणपत्राची तपासणी करण्यात पालिका अपुरी पडत असल्याचे मागील काही आगीच्या दुर्घटनांमधून निदर्शनास आले आहे.

५५० संस्थांना तपासणी करण्याचे परवाने दिले आहेत. प्रत्येक सोसायटी, हॉटेल, इमारतीच्या अग्निप्रतिबंधात्मक यंत्रणेची तपासणी या संस्था करू शकतात. दर सहा महिन्यांनी फायर फायटिंग सिस्टीम आणि यंत्रणेची तपासणी करायची असते, त्याची अत्यंत आवश्यकता आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. प्रत्येक सोसायटीने स्वत: त्याची तपासणी करायची असते. प्रत्येक हॉटेल, सोसायट्यांमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्यासाठी, नियमांची पायमल्ली करणाºयांवर कारवाई करण्यासाठी अग्निशमन दलाचा स्वतंत्र डेडिकेटड सेल तयार करणार आहोत. जर एखाद्याने अग्निशमन दलाचे नियम पाळले नाहीत व त्यांची वास्तू इमिनेंट डेंजरमध्ये असेल तर त्यांचा परवानाच रद्द केला जाईल. प्रिमायसेस सील केले जाईल.
- राम धस, उपायुक्त, मुंबई महापालिका

हॉटेल, कार्यालय, इमारतींमध्ये आग लागण्याची दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका आणि अग्निशमन दलाकडून काही नियम घालून दिलेले आहेत. या नियमांची अनेक जण पायमल्ली करतात. तसेच प्रशासनही त्यावर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरत आहे. सामान्य नागरिक आणि हॉटेलमालक याबाबत बेफिकीर असल्याचे चित्र आहे.

ना हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण न करण्यामागची कारणे

हॉटेलांमध्ये जागांचे नियम पाळलेले नसतात. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यामध्ये बदल केलेले असतात.
क्षमतेपेक्षा जास्त लोकांची, टेबल-खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली असते.
हॉटेलांमध्ये ग्राहक वाढले की स्वयंपाक, स्वयंपाकासाठीचे सिलिंडर, चूल या सर्वांची संख्या वाढवण्यात आलेली असते.
च्हॉटेलमधील व्यवस्थेत बदल केलेले असतात. ज्यामुळे लोकांना आगीसारख्या दुर्घटना घडल्यानंतर बाहेर पडणे मुश्कील होते.
च्त्वरित पेट घेतील अशा वस्तू हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या असतात.
च्शोभेच्या वस्तू, प्लास्टीक आणि लाकडाच्या वस्तू, सुशोभीकरणासाठी लाकडी टेबल, खुर्च्यांची संख्या वाढवलेली असते.
च्अनेक ठिकाणी लाकडाचे फ्लोरिंग बनवलेले असते.
च्एकंदरीत ना
हरकत प्रमाणपत्रासाठी बनवलेल्या
सर्व नियमांची पायमल्ली केलेली असते.

स्वयंपाकघर सुरक्षित हवे
हॉटेलांमध्ये असलेले स्वयंपाकघर सुरक्षित असायला हवे. स्वयंपाकघरात प्रामुख्याने अग्निशामक आणि वाळू उपलब्ध असावी. परवानगी असेल तितकेच गॅस सिलिंडर ठेवावेत. विद्युत उपकरणेही सुरक्षित असायला हवीत.

अग्निशमन दलातही अधिकारी व कर्मचारी वर्गाची कमतरता असल्यामुळे नवे अधिकारी व कर्मचारी भरती करण्याची प्रक्रिया येत्या काळात सुरू होईल.

अपुरे मनुष्यबळ
मुंबई शहराची लोकसंख्या, विस्तृत प्रदेशाच्या तुलनेने अग्निशमन दलाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दल येत्या काळात नव्या अधिकाºयांची आणि कर्मचाºयांची भरती करणार आहे. त्यासंबंधी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

अग्निप्रतिबंधक यंत्रणा
हॉटेल, मॉल्स, आस्थापना, कार्यालयांमध्ये सुसज्ज अग्निप्रतिबंधक यंत्रणा असायला हवी. त्यामध्य प्रामुख्याने फायर हॉस हिल्स, फायर हायड्रेंट सिस्टिम, आॅटोमॅटीक स्प्रिंक्लर सिस्टिम अशा काही प्रमुख यंत्रणा असणे आवश्यक आहे.

कर्मचाºयांचे
प्रशिक्षण गरजेचे
हॉटेल, कार्यालयांमध्ये काम करणाºया कर्मचाºयांना अग्निशामक आणि तत्सम यंत्रणा हाताळण्यासाठी योग्य प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. ज्या कंपनीकडून अग्निशामक आणि तत्सम यंत्रणांमधील साहित्य खरेदी केले जाते त्या कंपन्यांनी अशा प्रकारे प्रशिक्षण देणे गरजेचे असून, अग्निशमन दलाने तसे नियम घालून दिले आहेत. कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यासाठी अग्निशमन दल अथवा पालिकेने अशी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करायला हवीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

Web Title:  When will the firecracker series stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.