मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनन्स येथून दिल्ली, पुणे यांसह नागपूर आणि दक्षिण व उत्तर भारत यांना जोडणाऱ्या अनेक रेल्वे ये-जा करतात. कोरोनापासून आतापर्यंत केवळ ५५ विशेष रेल्वे सुरू आहेत. कोरोनापूर्वी पॅसेंजर मिळून ५८ रेल्वे गाड्यांची ये-जा होती. यातील आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळ येथे जाणाऱ्या तीन गाड्या बंद आहेत. अनेक प्रवाशांना आरक्षण मिळेनासे झाले आहे. प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनन्स हबिबगंज एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनन्स विशाखापट्टणम एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनन्स कोचुवेली एक्स्प्रेस रेल्वे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच राज्यातील काही भागांत या थांबत असल्याने राज्यातील प्रवाशांनाही त्याचा फायदा होत होता मात्र या गाड्या बंद असल्याने खासगी प्रवासी वाहनाने गाव गाठण्याची वेळ अनेकांवर आली आहे.
बंद असलेल्या गाड्या
लोकमान्य टिळक टर्मिनन्स हबिबगंज एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनन्स विशाखापट्टणम
लोकमान्य टिळक टर्मिनन्स कोचुवेली
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
लोकमान्य टिळक टर्मिनन्स हाथीया एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनन्स फैजबाद एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनन्स भुवनेश्वर सुपरफास्ट एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनन्स हरिद्वार एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनन्स गोरखपूर एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनन्स कामाख्या एक्स्प्रेस
गाड्यांचे घोडे कुठे अडले
लोकमान्य टिळक टर्मिनन्स रेल्वेस्थानक येथून कोरोनापूर्वी किमान ५८ पॅसेंजर रेल्वे धावत होत्या. सध्या या सर्व गाड्या बंद आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु अनलॉक झाल्यावर सुरू झाल्या होत्या. परंतु अल्प प्रतिसादामुळे काही गाड्या बंद केल्या होत्या. त्यातील काही गाड्या पूर्ववत केल्या तर काही बाकी आहेत.
प्रवासी काय म्हणतात
लोकमान्य टिळक टर्मिनन्स गोरखपूर एक्स्प्रेस ये-जा करण्यासाठी विशेष रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवेश दिला जात नाही. नाशिक, जळगाव जाण्यासाठी रेल्वेने अडचणी येत आहेत. परंतु, रेल्वे विभाग सध्या महिनेवारीचे पासही देत नसल्याने गैरसोय होत आहे.
अतुल वाळके, प्रवासी
===Photopath===
270621\img_20210627_161851.jpg
===Caption===
रेल्वे बातमी