अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महत्त्वाकांक्षी योजनांची गुरुवारी दिल्लीत घोषणा केली. यामध्ये संपूर्ण देशभरातून पाचशे शहरांसाठीच्या ह्यअटल नागरी पुनरुज्जीवन आणि परिवर्तनह्ण(अमृत)योजनेत अकोला शहराचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी महापौर उज्ज्वला देशमुख, आयुक्त सोमनाथ शेटे उपस्थित आहेत. उद्या शुक्रवारी कार्यशाळेचा समारोप आहे.राज्यातील औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव, शिर्डी तसेच भिवंडीचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला असून, अकोला शहराचा ह्यअमृतह्णयोजनेत समावेश करण्यात आला. एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून, या योजनेंतर्गत शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करणे, भूमिगत गटार योजना प्रकल्प राबविणे तसेच घनकचरा व्यवस्थापन व मागणीनुसार एलईडी किंवा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल.*प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशसंबंधित महापालिका प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो तातडीने राज्य शासनाकडे तर राज्य शासनाने पंधरा दिवसांच्या आत केंद्राकडे पाठविण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. कामाला गती देण्यासाठी मनपाला २५ लक्ष रुपये अनुदान मिळेल.*वेतनासाठी पैसा नाहीचनागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. याकरिता विविध योजनांसाठी शासनसामार्फत निधी दिला जाणार असला तरी कर्मचार्यांच्या वेतनासाठी पैसा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. स्वायत्त संस्थांनी उत्पन्नाचे स्रोत वाढवून वेतनाची समस्या निकाली काढण्याची सूचना केली.
इनडोअर स्टेडियम कधी खुले होणार ?
By admin | Published: June 26, 2015 1:50 AM