लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना पॉझिटिव्हिटी दराबाबत मुंबई लेव्हल एकमध्ये येत नाही तोपर्यंत सामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याचा विचार केला जाणार नाही, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबई आजही लेव्हल तीनमध्ये आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी तो धोका संपलेला नाही. लोकल प्रवास तातडीने सामान्यांसाठी सुरू करणे शक्य नाही. काही जिल्ह्यांमध्ये आजही अतिशय चिंतेची स्थिती आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबतचे अधिकार हे स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. परिस्थितीचा दरवेळी आढावा घेऊन प्रशासन निर्बंधांबाबत निर्णय घेईल.
बाधितांपेक्षा बरे होणारे अधिकमुंबईत सोमवारी काेरोनाचे ५२९ रुग्ण आढळले, तर १९ मृत्यूची नोंद झाली आहे. शहर उपनगरांत दिवसभरात ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.