ठळक मुद्देमुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ?, मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार?मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा, असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रतिप्रश्न केले आहेत. मुंबई पुरामुळे तुंबणार नाही, याची हमी द्या!
मुंबईः लॉकडाऊन - 4 चे सूतोवाच करताना पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही?, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यालाच आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ?, मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार?, मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा, असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रतिप्रश्न केले आहेत. मुंबई पुरामुळे तुंबणार नाही, याची हमी द्या! केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच. आता तुम्ही काहीतरी करून दाखवा ना! देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार?, सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल! तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की, मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?, हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला, असं म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. तत्पूर्वी सामनाच्या अग्रलेखातून मोदींच्या नव्या पॅकेजवर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. 20 लाख कोटीच्या पॅकेजच्या वर्षावातून किती थेंब त्यांच्यापर्यंत पोहोचतील हे कोणीच सांगू शकणार नाही. देशभरातील प्रमुख शहरांतून लाखो मजूर पायी आपल्या राज्यांत निघाले आहेत. हे राज्यव्यवस्थेचे सगळ्यात मोठे अपयश आहे. मोदींनी या मजुरांबाबत संवेदना व्यक्त केल्या व आर्थिक पॅकेजमधून या मजुरांवर लक्ष केंद्रित केले जाईल असे सांगितले. या पार्श्वभूमीवर 20 लाख कोटी सरकार कोठून जमा करणार? मुंबईत 'मेट्रो' रेल्वेसारखे प्रकल्प सुरू आहेत. लखनौ, हैदराबाद, दिल्लीतही ते अर्धवट अवस्थेत आहेत. पुन्हा बुलेट ट्रेनचे जपानी ओझे कर्जाचेच आहेत. हे प्रकल्प आता पुढे जाणे कठीण आहे. पुन्हा अधूनमधून निवडणुका येतील व त्यावर राजकीय पक्ष, खासकरून सत्ताधारी वारेमाप खर्च करतील. देशाबाहेर काळा पैसा आहे, तो आणावा व गरिबांना वाटावा अशी एक स्वप्न योजना मोदी यांनी मांडली होती त्यावर काम करण्याची संधी कोरोना संकटाने दिली आहे. उद्योगपती, व्यावसायिक, व्यापारी यांनी गुंतवणूक करावी, असा माहोल आता निर्माण व्हायला हवा. उद्योगपती पळून जाणे हे आता नव्या आत्मनिर्भरतेकडे जाणार्या हिंदुस्थानला परवडणारे नाही. उद्योजक, व्यापारी यांना टिकवून ठेवावे लागेल. त्यासाठी दहशत निर्माण करणार्या ईडी, सीबीआयसारख्या 'राजकीय' संस्थांचे काही काळ 'लॉकडाऊन' करावे लागेल, असा सल्लाही शिवसेनेनं दिला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus : ...तर कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही, WHOने दिला गंभीर इशारा
वाद पेटला! चीनची दक्षिण चिनी समुद्रातील 'त्या' भागावर ताबा घेण्याची धमकी; तैवान करणार युद्धाभ्यास
दहशतवाद्यांना झटका! पाक सर्वोच्च न्यायालयानं २९० आतंकवाद्यांचा जामीन रोखला
CoronaVirus News : केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?
52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला
CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू
CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान