Mumbai Property Tax Waiver: मुंबईकरांना मालमत्ता करमाफी कधीपासून मिळणार? मागील ५वर्षांचा रिफंड मिळणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 08:24 AM2022-01-02T08:24:20+5:302022-01-02T08:35:48+5:30

१६ लाख घरांना फायदा; तर पालिकेला ४६२ कोटींची तूट

When will Mumbaikars get property tax exemption? Will get a refund for last 5 years? Find out ... | Mumbai Property Tax Waiver: मुंबईकरांना मालमत्ता करमाफी कधीपासून मिळणार? मागील ५वर्षांचा रिफंड मिळणार? जाणून घ्या...

Mumbai Property Tax Waiver: मुंबईकरांना मालमत्ता करमाफी कधीपासून मिळणार? मागील ५वर्षांचा रिफंड मिळणार? जाणून घ्या...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  मुंबईतील ५०० चौरस फूटांच्या निवासी मालमत्तांना करातून संपूर्ण सूट देण्याच्या निर्णयामुळे शिवसेनेने दिलेल्या आश्वासनाचे एक आवर्तन पूर्ण झाले आहे. गेल्या सरकारने मालमत्ताकरातून सूट देण्याचा निर्णय २०१९मध्ये घेतला. मात्र तो मालमत्तांवर आकारल्या जाणाऱ्या दहांपैकी केवळ सर्वसाधारण कराच्या सवलतीचा होता. त्यात सुधारणा करून आता सरसकट सर्वच करांतून या निवासी मालमत्तांना वगळ्यात आले आहे.  त्याची अमलबजावणी पुढील आर्थिक वर्षापासून होईल.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबईतल्या ५०० चौरस फुट घरांचा मालमत्ता कर सरकट माफ होणार आहे. आपण आधी जो कर देत होतो त्यामध्ये इतर सेवा सुविधाकरांचा समावेश होता. आता सेवा सुविधांचा करही माफ केला आहे. त्यामुळे १६ लाख घरांना फायदा होणार आहे.

पालिकेच्या उत्त्पनात यामुळे घट होईल. ही घट काही कोटींची आहे. मात्र शिवसेना नेहमीच नागरिकांबरोबर आहे हे आम्ही याद्वारे दाखवून दिले आहे, असे महापौर म्हणाल्या. 

मालमत्ता करातील इतर कर
nसर्वसाधारण कर
nजल कर
nजल लाभ कर
nमलनि:सारण कर
nमलनि:सारण लाभ कर
nमनपा शिक्षण उपकर
nराज्य शिक्षण उपकर
nरोजगार हमी उपकर
nवृक्ष उपकर
nपथकर

उत्पन्नाचे स्रोत
खरेदीदारांना मालमत्तेचे मालक होण्यासाठी एकरकमी रक्कम भरावी लागते. परंतु या मालमत्तेवर त्यांची मालकी टिकवण्यासाठी त्यांना मालमत्ता कराच्या रूपात सातत्याने लहान रक्कम भरावी लागते. म्हणून मालमत्ता कर हा मालमत्तेच्या मालकीवर लादलेला थेट कर आहे. मालमत्ता कर भरणे हे विकास आणि नागरी संस्थांसाठी उत्पन्नाचे स्राेत आहेत. 

बिल येणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ५०० चौरस फुटांखाली घरांचा मालमत्ता कर सरसकट माफ केल्यानंतर आता मुंबईकरांना मालमत्ता कराचे बिल येऊ नये. या आधीही एक निर्णय झाला होता. मात्र तेव्हा मालमत्ता कर घेणार नाही उर्वरित कर घेणार, असे सांगण्यात आले. म्हणजे ५० टक्के कर माफ झाला होता. आता सरसकट कर माफ झाला आहे. 
- रमेश प्रभू, गृहनिर्माण अभ्यासक 

पाच वर्षांचा कर रिफंड करा
सरकारने २०१७ साली मालमत्ता कर माफ करणार, असे वचन दिले होते. आज हे वचन पूर्ण करण्यास पाच वर्षे लागली. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या की  असे निर्णय घेतले जातात. लोकांची दिशाभूल केली जाते. असे होता कामा नये. आणि एवढेच असेल तर गेल्या पाच वर्षांत मुंबईकरांनी जो मालमत्ता कर भरला तो सगळा रिफंड करण्यात यावा. - संजय तुर्डे, नगरसेवक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

जनजागृती करावी : सरकारने उत्तम निर्णय घेतला आहे. मालमत्ता करासोबत इतर कर माफ झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुळात या खुप तांत्रिक गोष्टी आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेने सोसायटीमध्ये याबाबत जनजागृती करावी. जेणेकरून सोसायटीमध्ये गोंधळ होणार नाही. - सुरेंद्र मोरे, गृहनिर्माण अभ्यासक
 

Web Title: When will Mumbaikars get property tax exemption? Will get a refund for last 5 years? Find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई