मुंबई : पालिकेच्या केईएम रुग्णालयात शनिवारी कोविशिल्ड लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी लसीकरणाच्या प्रतीक्षेत बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनात दिसून येते आहे.
ड्युटीच्या वेळा संभाळून आज सकाळपासून या कक्षात ही मंडळी वाट पाहत बसलेली आहेत. के एम रुग्णालयात लसीचा पहिला डोस रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ मिलिंद नाडकर यांनी घेतला आहे, त्यानंतर आरोग्य कर्मचारी विमल खरात आणि डॉ शेखर जाधव यांना लसीचा डोस देण्यात आला.
लसीकरण केंद्रात मुख्य कक्षात नोंदणी पडताळल्यानंतर स्वाक्षरी करून लस देण्यात येत आहे. लस घेताना कर्मचाऱ्यांचा चेहऱ्यावर आनंदाची भावना दिसून येत आहे. शिवाय लस घेतल्यानंतर या कर्मचाऱ्यांना काही काळ मॉनिटर करण्यात येत आहेत त्यासाठी विशेष चमुची नियुक्ती करण्यात आली आहे.
लसीचा डोस घेतलेल्या डॉ मीनल शहा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, आज खूप समाधानाची भावना आहे इतक्या खडतर काळात काम केल्यानंतर आज लसीकरणासाठी आम्हाला प्राधान्य देण्यात आले आहे , त्यातही पहिल्याच दिवशी डोस मिळाल्याने आनंद आहे.