पाझर तलाव कधी होणार?

By Admin | Published: April 7, 2015 10:54 PM2015-04-07T22:54:41+5:302015-04-07T22:54:41+5:30

तालुक्यातील डोल्हारा गावचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून घोटभर पाण्यासाठी येथील आदिवासी महिलेचा बळी गेल्याच्या घटनेने संपूर्ण

When will the percolation pond? | पाझर तलाव कधी होणार?

पाझर तलाव कधी होणार?

googlenewsNext

मोखाडा ग्रामीण : तालुक्यातील डोल्हारा गावचा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर असून घोटभर पाण्यासाठी येथील आदिवासी महिलेचा बळी गेल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाझर तलावाला मंजूरी दिली. मात्र, कामाला सुरूवात होऊन बराच कालावधी उलटल्यांनतरही या तलावाचे काम अर्धवट असल्याने डोल्हारावासीयांमध्ये तीव्र नाराजी आहे.
डोल्हारा गावची लोकसंख्या १४६० इतकी असून सद्यस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करून डोल्हारावासीयांची तहान भागवली जात आहे. पार्वती जाधव या आदिवासी महिलेचा पाणीटंचाईने बळी घेतल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाच्या अंतर्गत १ कोटी ५६ लाखाच्या पाझर तलावाच्या कामाला मंजूरी देऊन २०१२ मध्ये या कामाला सुरूवात करण्यात आली. १७ मिटर उंचीच्या पाझर तलावात ४६७ टि.एल.एम पाणीपुरवठा होणार. हे काम पूर्ण करण्याचा कालावधी ३ वर्षाचा असून अद्याप हे काम पूर्ण तर झालेले नाहीच पण अनेक महिन्यापासून हे काम बंदच आहे. आता तर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई सतावत असताना हे अर्धवट काम कधी पूर्ण होईल, असा सवाल आदिवासींना भेडसावत आहे. (वार्ताहर)

Web Title: When will the percolation pond?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.