रेल्वे प्रशासनाला जाग येणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:42 AM2017-10-20T04:42:03+5:302017-10-20T04:43:47+5:30

एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील गर्दीच्या रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. परिणामी, झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आता बास’ वृत्त मालिका सुरू करत...

 When will the railway administration wake up? | रेल्वे प्रशासनाला जाग येणार कधी?

रेल्वे प्रशासनाला जाग येणार कधी?

Next

मुंबई : एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील गर्दीच्या रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. परिणामी, झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आता बास’ वृत्त मालिका सुरू करत, रेल्वेच्या गलथान कारभाराचा पाढा वाचला. दादर, कुर्ला, घाटकोपरसह मालाड, लोअर-परळ अशा सर्वच रेल्वेस्थानकांवरील समस्यांना वाचा फोडत, मुंबईकरांना बोलते केले. मुंबईकर प्रवाशांनीही रेल्वे प्रशासनाच्या नावाने खडे फोडत ‘बुलेट टेÑनऐवजी रेल्वे सुधारा’, असे मत मांडले. मुंबईकर प्रवाशांनी मांडलेली ही मते त्यांच्याच शब्दात ‘आता बास’ या वृत्त मालिकेतून.

एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वेस्थानकावरील फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, फेरीवाल्यांच्या बाजूनेही विचार होणे आवश्यक आहे. फेरीवाल्यांमध्ये अंध, अपंग आणि महिला असतात. त्या किरकोळ वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे अंध, अंपग, गरजू फेरीवाल्या महिलांसाठी पर्यायी व्यवस्था करावी. - दीपक सोनोने, उल्हासनगर

चर्नी रोड येथील ३५ ते ४० वर्षे जुना पादचारी पूल पडला; परंतु रेल्वेच्या अधिकाºयांना पूल पडल्यानंतरच जाग आली. याआधी रेल्वेने लक्ष द्यायला हवे होते. जुन्या आणि धोकादायक पुलांचे इतक्या वर्षांमध्ये रेल्वेने आॅडिट का नाही केले ? मुंबईत पुन्हा एल्फिन्स्टन रोड, चर्नी रोडसारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी रेल्वेने त्वरित सर्व रेल्वेस्थानक आणि पुलांचे सर्वेक्षण करून धोकादायक पुलांची डागडुजी करावी, अथवा ते पूल पाडून नवे पूल बांधावे. - रूपेश भोईर, कल्याण

कोपर स्थानकावर मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांच्या लोकल थांबतात. त्यामुळे या स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पुलांवरून चालताना प्रवाशांचा जीव अक्षरश: गुदमरतो. स्थानकावरील पुलांची संख्या वाढवावी आणि पुलांचे रुंदीकरण करावे, यासाठी मनसेतर्फे विभागात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर याबाबत रेल्वेकडे कित्येकदा पत्रव्यहार केला; परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
- अरुण जांभळे, शाखा अध्यक्ष, मनसे, डोंबिवली

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने सर्व स्थानकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. स्थानके आणि पुलांसाठी कृती योजना राबवावी. रेल्वेस्थानकांवरील पुलांची संख्या वाढवावी आणि लोकलची संख्या वाढवणे आवश्यक आहे. - वसंत सगभोर, प्रवासी

Web Title:  When will the railway administration wake up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.