मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ आणि ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाचा प्रवास कितपत सुरक्षित राहिला आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या सहा वर्षांत एसटी अपघातात ३ हजार ३३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर तब्बल ३८ हजार ४८१ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. मात्र होणाऱ्या प्रत्येक अपघातात एसटी चालकांचीच चूक नसून अन्य वाहनांचीही चूक असल्याचे महामंडळातील अधिकारी सांगतात.दारू पिऊन वाहन चालवणे, वेगाने वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत असून अनेकांचा त्यामध्ये जीव जात आहे. यामध्ये एसटी महामंडळाच्या बस गाड्यांच्या अपघातांचाही समावेश आहे. अपघात होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून चालकांची आरोग्य तपासणी करणे, अपघातांबाबत जनजागृती करणे इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. मात्र असे अनेक उपक्रम घेऊनही पूर्णपणे अपघात कमी करण्यात एसटी महामंडळालाच काय तर महामार्ग पोलिसांनाही अपयश आले आहे. गेल्या सहा वर्षांत एसटीचे १९ हजार ४५१ अपघात झाले असून यात २ हजार ४४0 प्राणांतिक, १३ हजार १0७ गंभीर आणि ३ हजार ९0४ किरकोळ अपघात आहेत.
एसटीचे अपघात कमी होणार तरी कधी?
By admin | Published: August 18, 2015 3:14 AM