नामदेव मोरे ल्ल नवी मुंबईमहापालिकेमध्ये अनेक कर्मचारी व अधिकारी एकाच विभागात ५ ते १० वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत. स्वत:चीच मालमत्ता असल्याच्या थाटात काही जण वावरू लागले आहेत. एलबीटी व इतर महत्त्वाच्या जागांवर वर्षानुवर्षे राहण्याकडे कल वाढत असून, या ‘चिकटू’ कर्मचाऱ्यांच्या नियमाप्रमाणे बदल्या करण्याची मागणी होत आहे. शासकीय कार्यालयांमधील कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियमाप्रमाणे बदल्या केल्या जातात. एकाच विभागात ठरावीक कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण होऊ नये, कामकाज लोकाभिमुख व्हावे, यासाठी साधारणत: तीन वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. शिपाई किंवा इतर कर्मचाऱ्यांच्याही आवश्यकतेप्रमाणे बदल्या केल्या जातात. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही वर्षांपासून महत्त्वाच्या विभागांमध्ये ठरावीक कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. तब्बल १,१५० जण तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच विभागात काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. जवळपास २८ जण दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. महापालिकेला सर्वात जास्त उत्पन्न एलबीटी विभागाकडून मिळते. या विभागात तब्बल ५२ जण तीन वर्षांपेक्षा जास्त वर्षे काम करत आहेत. अनेकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मालमत्ता कर विभागातही १५ पेक्षा जास्त जण अनेक वर्षे खुर्चीला चिकटून बसले आहेत. शहर अभियंता विभागात ५० जणांच्या बदल्यांची मुदत संपली आहे. अग्निशमन दलामध्येही कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेतही महत्त्वाच्या विभागात वर्णी लावून घेण्यासाठी वशिलेबाजी सुरू झाली आहे. बदल्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातात. अनेक विभागप्रमुखही ठरावीक कर्मचाऱ्यांसाठी आग्रही असतात. बदल्या केल्यानंतर त्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले जातात किंवा ठरावीक काळ दुसऱ्या ठिकाणी काम करून पुन्हा त्याच विभागात आणले जातात. आरोग्य विभागात सर्वाधिक अनागोंदी आहे. तब्बल ५८३ जण ३ वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करत आहेत. रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्स या कर्मचाऱ्यांची गरज असल्यामुळे त्यांना त्या विभागात ठेवणे आवश्यक असते. बदल्या करण्यासाठी फारशी संधी नसते. याचाच फायदा अनेकांना होत आहे. प्रशासनाने आरोग्य विभागातही योग्य समन्वय साधून कोणाचीही एकाधिकारशाही निर्माण होऊ देऊ नये, अशी मागणी होत आहे. एकाच ठिकाणी कर्मचारी अनेक वर्षे राहिल्यामुळे त्याचा कामावर परिणाम होत आहे. नागरिकांशी असलेले वर्तन एक प्रकारच्या बेदरकारपणामुळे बदलण्याची शक्यता असते. प्रामाणिक कर्मचाऱ्यांवरही त्याचा परिणाम होत आहे. यामुळे महापालिका आयुक्तांनी स्वत: लक्ष देऊन या ‘चिकटू’ कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव्या, अशी अपेक्षा अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांच्याही बदल्या नाहीतच्एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे काम करत असलेल्यांमध्ये कर्मचाऱ्यांप्रमाणे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत तायडे हे स्वत: ६ वर्षे एकाच ठिकाणी काम करत आहेत. च्त्यांच्यासह मालमत्ता कर, एलबीटी व इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांच्याही अनेक वर्षांपासून बदल्या झालेल्या नाहीत. अधिकाऱ्यांच्याही बदल्या व्हाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विभागकर्मचारीएलबीटी५१परिमंडळ १३१लेखा४प्रशासन२४लेखापरीक्षण३नेरूळ वॉर्ड३०मध्यवर्ती ग्रंथालय८शहर अभियंता५०संगणक१५वाशी वॉर्ड२६तुर्भे वॉर्ड२६विभागकर्मचारीकोपरखैरणे वॉर्ड१९विद्युत२३मालमत्ता ५घणसोली वॉर्ड१८वाशी फायर७९आरोग्य५८३ऐरोली वॉर्ड२७उद्यान१०दिघा वॉर्ड१५विधी४मोर्बे प्रकल्प१३विभागकर्मचारीसचिव विभाग९मालमत्ता कर १५पब्लिक हेल्थ२२माध्यमिक शिक्षण३२घनकचरा ९माध्यमिक शिक्षण३२नगररचना११योजना११वाहन ६वॉटर३२च्महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मालमत्ता कर विभागही मुख्यालयात हलविण्यास सुरुवात केली आहे. च्आयुक्तांनी स्वत: लक्ष देऊन एकाच विभागात ठाण मांडून बसणाऱ्यांच्या नियमाप्रमाणे बदल्या कराव्या. बदल्या करताना वशिलेबाजीला स्थान देवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.महापालिकेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वर्षी बदल्या केल्या जातात. यावर्षी बदल्या मेअखेरपर्यंत केल्या जाणार आहेत. याविषयी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. - जगन्नाथ सिन्नरकर, उपआयुक्त,मुख्यालय
‘चिकटू’ बदलणार कधी?
By admin | Published: May 26, 2015 12:53 AM