बळीराजाशी गद्दारी थांबणार तरी कधी? १०८५ तक्रारी; ९९४८ बॅग बोगस बियाणे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 09:33 AM2023-07-26T09:33:01+5:302023-07-26T09:33:18+5:30

वर्षभराची खेप म्हणून शेतकरी मोठ्या अपेक्षेने महागड्या बियाणांची खरेदी करून पेरणी करतो.

When will the betrayal with Baliraja stop? 1085 complaints; 9948 bags of bogus seeds seized | बळीराजाशी गद्दारी थांबणार तरी कधी? १०८५ तक्रारी; ९९४८ बॅग बोगस बियाणे जप्त

बळीराजाशी गद्दारी थांबणार तरी कधी? १०८५ तक्रारी; ९९४८ बॅग बोगस बियाणे जप्त

googlenewsNext

मुंबई : वर्षभराची खेप म्हणून शेतकरी मोठ्या अपेक्षेने महागड्या बियाणांची खरेदी करून पेरणी करतो. मात्र, दरवर्षी अनेक कंपन्यांकडून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येते. यंदा अद्याप खरिपाची पेरणी पूर्ण झाली नसली तरी आतापर्यंत बोगस बियाणांच्या १०८५ तक्रारी राज्यभरातून आल्या आहेत. यापैकी बहुतांश तक्रारी या कापूस आणि सोयाबीन बियाणांच्या आहेत. त्यापैकी ९२७ पंचनामे झाले आहेत, तर एकूण ९९४८ बोगस बियाणांच्या बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. ४२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीने शेतशिवार खरडून निघत असतानाच मोठी जोखीम घेऊन शेतकरी कोट्यवधी रुपयांचे बियाणे मातीत टाकतो. हे बियाणे बोगस निघाल्याने पुन्हा महागडे बियाणे घेऊन दुबार पेरणी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांशी ‘दगाबाजी’ करणाऱ्या कंपन्यांवर सरकार चाप कधी लावेल, हा प्रश्न आहे.

या जिल्ह्यात एकही प्रकरण नाही

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, सांगली, कोल्हापूर व वाशिम जिल्ह्यात बोगस बियाणांची जप्ती, कारवाई आणि तक्रारीचे एकही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही, अशी प्रशासनाची माहिती आहे.

बंदीचे आदेश

प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे विक्रीप्रकरणी नऊ, बाेगस कांदा बियाणे विक्रीप्रकरणी एका जणावर गुन्हा. 

वर्धा : भरारी पथकाने १४.५८ मे. टन बियाणे जप्त करून ५० दुकानदारांना बंदीचे आदेश दिले.
सातारा : बियाणे बनविणारी कंपनीच अस्तित्वात नसल्याचे चौकशीत आढळले.
जळगाव : बोगस बियाणे विकणाऱ्या ७ जणांचे परवाने रद्द केले. बोगस खतांमुळे ९०० हेक्टरवरील पिकांची वाढ खुंटली. 

अमरावतीत प्रतिबंधित एचटीबीटी कपाशीच्या ५०७ बॅग जप्त केल्या. 

नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या बाेगस बियाणांचे ८८५ पाकिटे जप्त केली. 

    अकोला    ००    ००    ६०    ५४
    अमरावती    ५५७    ०४    ११८    ११८
    बुलढाणा    ३,०८६    ०१    ४३    ४३
    यवतमाळ    १०७    ०२    ०१    ०१
    नागपूर    ००    ००    ०१    ०१
    भंडारा    ००    ००    ०२    ०१
    चंद्रपूर    २५६    १२    ४६    ४६
    गडचिरोली    ५००    ०१    ०३    ०३
    वर्धा    ४५६    ०३     ००    ००
    गोंदिया    २०    ०२    ००    ००
    औरंगाबाद    ००    ००    ३५    ३५
    जालना    ८८४    ०१    ७८    ७५
    बीड    ००    ००    ११५    ८६
    लातूर    ००    ००    २००    १९३
    धाराशिव    ००    ००    ३७    ३५
    नांदेड    १,३१०    ०३    ४३    ००
    परभणी    ९५९    ०३    १०    १०
    हिंगोली    ००    ००    ८८    ८८
    जळगाव    ३५९५    १०    ००    ००
    धुळे    ४२४    ०३    ००    ००
    नाशिक    ८८५    ०१    ०३    ०३
    अहमदनगर    ००    ००    १९९    १३५
    नंदुरबार    १११५    ०२    ००    ००
    सातारा    ००    ०२    ००    ००
    सोलापूर    ००    ००    ०३    ००

Web Title: When will the betrayal with Baliraja stop? 1085 complaints; 9948 bags of bogus seeds seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी