मुंबई : रेल्वे प्रवासात निष्काळजीपणाची प्रकरणे फार वाढत चालली आहेत. काही दिवसांपूर्वी जेवणात झुरळ आढळल्यानंतर आता पुन्हा असेच प्रकरण समोर आले आहे. रविवारी दुपारी २ च्या सुमारास अर्णव कुशवाह कानपूरवरून लांब पल्ल्याच्या गाडीत प्रवास करत असताना त्यांनी झूप फूडवरून जेवण मागवले पण त्याचा दर्जा चांगला नसल्याने कुशवाह यांनी संताप व्यक्त केला आहे.
कुशवाह यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, रेल्वेच्या झूप फूडमधील द रॉयल किचन हा सर्रासपणे फसवणूक करत आहे. अन्नाची चव घेण्यापूर्वी तुम्हाला रेटिंग देण्यास भाग पडले जाते. मी बटर चिकन थाळी ऑर्डर केली होती. त्यासाठी ५९७ रुपये मोजले पण अन्नाचा दर्जा चांगला नव्हता. भात आणि भाजी कमी दिली. तसेच, रुमाली रोटी मागितली असताना साधी रोटी दिली.
डिसेंबरमध्ये दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लहान मुलीसाठी ऑम्लेट मागवले होते. ज्यामध्ये केटरिंग विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना अन्नात झुरळ आढळून आले होते.