Join us

गोकुळधाम साई मार्गच्या रस्त्याचे काम कधी होणार पूर्ण?; उद्धव सेनेचा आंदोलनाचा इशारा

By मनोहर कुंभेजकर | Published: May 24, 2024 6:35 PM

रुग्णांना उचलून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेवून जावे लागते असा आरोप स्थानिकांनी केला

मुंबई: गोरेगाव पूर्व गोकुळधाम प्रभाग क्रमांक ५२ येथील साई मार्गावर रस्त्याचे काम गेली तीन वर्षे महापालिकेकडून सुरू आहे. त्यामुळे येथील हजारो स्थानिक नागरिकांना या रस्त्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. येथे वाहने खड्यात खड्यात पडून अपघात झाले असल्याने वयस्कर व लहान मुलांना अपघाताला सामोरे जावे लागते. तर या मार्गावर दोन शाळा व दोन हॉस्पिटल तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाची वसाहत असून येथील हजारो परिवारांना या त्रासाला सामोरे जावे लागते. रुग्णांना तर उचलून दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेवून जावे लागते असा आरोप स्थानिकांनी केला.

कधी ठेकेदार यांची गॅसची पाईप लाईन तोडतो तर कधी पाण्याची हॉस्पिटलमध्ये रुग्ण अतिदक्षता विभागात असताना हॉस्पिटलची पाण्याची मुख्य लाईन तोडतो. नागरिक इतका त्रास सहन करत असून सुद्धा पी दक्षिण विभाग याकडे दुर्लक्ष करतो असा आरोप उद्धव सेनेचे ५२चे शाखाप्रमुख संदिप गाढवे यांनी केला.

गेल्या वर्षी पावसाळ्यात सर्व इमारतीमध्ये पावसाचे पाणी

मोठ्या प्रमाणात शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले होते.जर पावसाळ्याच्या अगोदर जर संबंधित अधिकाऱ्यांनी  उपाययोजना केल्या नाही, तर गोकुळधामचे सर्व नागरीक रस्त्यावर उतरून पी दक्षिण विभाग कार्यालयावर धडक मोर्चा  काढणार असल्याचा इशारा संदिप गाढवे यांनी दिला आहे.

टॅग्स :मुंबई