मुंबईत स्वत:चे घर कधी घेणार ? म्हाडाच्या घरांच्या किमतीही ३० लाखांच्या पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:16 AM2023-07-26T11:16:50+5:302023-07-26T11:17:01+5:30
सामान्यांचे स्वप्न होणार का पूर्ण...
मुंबई : घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या कच्चा साहित्याच्या किमती दिवसागणिक वाढतच असून, यामुळे घरांचे भावही वाढत आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरातील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा असून, आयुष्यभर कष्ट केले तरी स्वप्नातील घर साकार होत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. विशेषत: म्हणजे म्हाडाकडूनही ऑगस्ट महिन्यात ४ हजार ८२ घरांची लॉटरी काढण्यात येणार असली तरी म्हाडाच्या घरांच्या किंमतीही ३० लाखांच्या पुढे आहेत. त्यात हा नशिबाचा खेळ असल्याने मुंबईत स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न स्वप्नच राहत असल्याचे चित्र आहे.
घरांच्या किमती १ कोटी
मुंबईत उच्चस्तरीय मालमत्तांना अधिक मागणी असून जानेवारी ते मार्च २०२३ पर्यंत मुंबईत विक्री करण्यात आलेल्या २७ टक्के घरांच्या किमती १ कोटी रुपये व त्याहून अधिक किमतीच्या असल्याचे प्रॉपटायगरच्या अहवालातून निदर्शनास आले आहे.
डोंबिवली, भिवंडी व वसई
नवीन सदनिका लाँचसंदर्भात तीन बाजारपेठांमध्ये मुंबई शहर २०२३च्या पहिल्या तिमाहीत अव्वलस्थानी होते.
पहिल्या तिमाहीदरम्यान मुंबईमध्ये सरासरी किंमत १०,००० रुपये ते १०,२०० रुपये (प्रतिचौरस फूट रुपयांमध्ये) होती.
मुंबईमध्ये नवीन पुरवठ्याचे बहुतांश प्रमाण डोंबिवली, भिवंडी व वसई या सूक्ष्म-बाजारपेठांत दिसून आले.
नवीन पुरवठ्यामध्ये वाढ होण्याव्यतिरिक्त मुंबईमध्ये २०२३च्या पहिल्या तिमाहीदरम्यान विक्रीतील वाढ
२०२३च्या पहिल्या तिमाहीत विक्रीमध्ये फक्त
३ टक्क्यांची किरकोळ वाढ दिसली.
पहिल्या तिमाहीत गृहखरेदीदारांसाठी सर्वात पसंतीचे स्थान म्हणून डोंबिवली, ठाणे पश्चिम व पनवेल उदयास आले.