Join us

जलयुक्त शिवार योजनेचे 7.5 हजार कोटी गेले कुठं ? पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 5:32 PM

राज्यातील ऐरणीच्या दुष्काळाच्या प्रश्नावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली.

मुंबई - जलयुक्त शिवार योजनेचे साडे सात हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, जलयुक्त शिवार योजनेमुळे साडेसोळा हजार गावांना पाणी मिळाले. पण, मोदींचा हा दावा खोटा आहे. सरकारने गाजावाजा करत ही योजना आणली. मात्र, कामे झाली असल्याचे दिसत नाही. मग या योजनेचे साडे सात हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. 

राज्यातील ऐरणीच्या दुष्काळाच्या प्रश्नावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांनी आणि जनतेची फसवणूक झाल्याचे म्हटले. राज्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे. 1972 हूनही भयंकर दुष्काळ परिस्थिती आज निर्माण झाली आहे. मात्र, सरकार दुष्काळ घोषित करत नाही. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी आ. पवरा यांनी यावेळी केली. तसेच 33 टक्के वीजबील माफ असे सरकार म्हणते. मात्र, महावितरण अजूनही बीलं पाठवतच आहे. कोळशाबाबत समन्वय साधावा तर सरकार म्हणतंय की कोळसा नाही. सणांच्या दिवशी लोकांना अंधारात ठेवण्याचे काम सरकार करत आहे. सरकारने भारनियमन ताबडतोब रद्द करावे, असेही पवार यांनी यावेळी म्हटले.

 

टॅग्स :अजित पवारधनंजय मुंडेदेवेंद्र फडणवीसदुष्काळ