कर्मभूमीचे गोडवे गाणारे बॉलिवूड कलाकार कुठेत? मनसेकडून तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:48 PM2019-08-12T12:48:41+5:302019-08-12T12:50:37+5:30

महाराष्ट्रावरील कोल्हा'पूरसंकट' देशानं पाहिलंय, देशभरातून त्यासाठी मदत येत आहे.

Where is the Bollywood artist singing the sweet song of Karmabhoomi? Annoying question of MNS in flood situation of kolhapur and sangli | कर्मभूमीचे गोडवे गाणारे बॉलिवूड कलाकार कुठेत? मनसेकडून तीव्र संताप

कर्मभूमीचे गोडवे गाणारे बॉलिवूड कलाकार कुठेत? मनसेकडून तीव्र संताप

Next

मुंबई - सांगली अन् कोल्हापूरातीलपूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत.

महाराष्ट्रावरील कोल्हा'पूरसंकट' देशानं पाहिलंय, देशभरातून त्यासाठी मदत येत आहे. मात्र, मुंबई अन् महाराष्ट्रातून जगभर पसरणारा बॉलिवूड कुठं गेलाय ? बॉलिवूडकरांना हे संकट दिसत नाही का? असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला आहे. आता, मनसेने याबाबत प्रश्न विचारला आहे. "समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण... महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत? असा प्रश्न मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी विचारला आहे. तर, असो, आम्ही आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू, असेही त्यांनी सांगितले आहे. 

लानत है उनपर, जिनके पास दानत नही है.... असे म्हणत मनसेनं बॉलिवूड कलाकारांना फटकारलं आहे. महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे, असं सांगणारे बॉलिवूड कलाकार या संकटकाळात कुठे होते ? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर आपल्या तुंबड्या भरतात तेच प्रेक्षक जेव्हा दु:खात आहेत, तेव्हा त्यांना सावरण्यासाठी पुढे का आले नाहीत? एकमेकांच्या टुकार सिनेमाचं प्रदर्शन करण्यासाठी उठसूठ व्हिडीओ बाईट पोस्ट करणारे हिरो, यांना मदतीचं आवाहन करणारा एक साधा व्हिडीओही टाकता आला नाही ? या बॉलिवूड कलाकरांना कर्मभूमीच विसर पडलाय, याचा संताप होतोय, असे म्हणत खोपकर यांनी मनसेच्यावतीने नाराजी व्यक्त केली आहे. 


 

Web Title: Where is the Bollywood artist singing the sweet song of Karmabhoomi? Annoying question of MNS in flood situation of kolhapur and sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.