‘यारी-दोस्ती’ पडणार भारी! जनजागृतीच्या पोस्टरचा खर्च आणायचा कुठून?; मुंबई पोलिसांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 12:33 AM2020-10-13T00:33:30+5:302020-10-13T00:33:46+5:30

Coronavirus, Mumbai Police News: कोरोनाबाबत बॅनर लावण्याचे आयुक्त कार्यालयातून निर्देश

Where to bring the cost of public awareness posters ?; Mumbai police had a question | ‘यारी-दोस्ती’ पडणार भारी! जनजागृतीच्या पोस्टरचा खर्च आणायचा कुठून?; मुंबई पोलिसांचा प्रश्न

‘यारी-दोस्ती’ पडणार भारी! जनजागृतीच्या पोस्टरचा खर्च आणायचा कुठून?; मुंबई पोलिसांचा प्रश्न

googlenewsNext

गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी घरोघरी जा, तसेच ठिकठिकाणी बॅनर पोस्टर लावा, असे निर्देश पोलीस ठाण्यांना आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत. मात्र यासाठीचा खर्च आणायचा कुठून, असा सवाल आता मुंबई पोलिसांना पडला असून त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे.

कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘जनजागृती मीटिंग’ आणि ‘कॉर्नर मीटिंग’ घेण्याचे निर्देश ब्रॉडकास्टिंग क्रमांक १४६ नुसार पोलीस ठाण्यांना १० ऑक्टोबर, २०२० रोजी देण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दररोज रात्री बारा वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात पाठविणे सक्तीचे आहे. या अहवालामध्ये संबंधित पोलीस ठाण्यातील किती अधिकारी किंवा कर्मचारी मीटिंगमध्ये सहभागी झाले, त्यांनी जनजागृती करणारे किती बॅनर किंवा पोस्टर लावले आणि किती लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली याची माहिती भरणे गरजेचे आहे. मात्र यामुळे गल्लोगल्ली जाऊन पोलिसांचा जीव धोक्यात टाकण्यात येत असल्याचे काही पोलिसांकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाची जबाबदारी पोलिसांना देण्यात येत असल्याने याचा अतिरिक्त भार त्यांच्यावर आला आहे. तसेच बॅनर आणि पोस्टर लावण्यासाठी पोलीस खात्याकडून निधी पुरविला जात नसल्याने कोणासमोर हात पसरायचे, असा सवालही उपस्थित करत याची दखल वरिष्ठांनी घ्यावी अशी विनंती केली जात आहे.

‘यारी-दोस्ती’ पडणार भारी!
लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय आधीच डबघाईला आला आहे. सर्व सुरळीत असताना आम्ही यारी-दोस्तीमध्ये काही बॅनर, पोस्टर मोफत पोलीस मित्रांना देऊ करत होतो. मात्र सध्या धंदा पूर्ण बसला असून आमचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आम्ही असे सहकार्य करू शकत नाही, असे बॅनर व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

Web Title: Where to bring the cost of public awareness posters ?; Mumbai police had a question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.