...हे तर बिल्डरांचे दुकान

By admin | Published: May 1, 2016 02:03 AM2016-05-01T02:03:24+5:302016-05-01T02:03:24+5:30

मुंबई महापालिकेने तयार केलेला नवीन विकास आराखडा हा केवळ बिल्डर लॉबीचे हित डोळ्यासमोर ठेवून बनविण्यात आला आहे. सामान्यांना परवडणारी घरे देण्याच्या नावाखाली सरकार बिल्डरांचे

... this is where builders shop | ...हे तर बिल्डरांचे दुकान

...हे तर बिल्डरांचे दुकान

Next

मुंबई : मुंबई महापालिकेने तयार केलेला नवीन विकास आराखडा हा केवळ बिल्डर लॉबीचे हित डोळ्यासमोर ठेवून बनविण्यात आला आहे. सामान्यांना परवडणारी घरे देण्याच्या नावाखाली सरकार बिल्डरांचे दुकान चालवत आहे. त्यामुळे काँग्रेसचा या विकास आराखड्याला तीव्र विरोध असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले की, महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यानुसार विकासकांना ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये बांधकामाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल १० हजार एकर क्षेत्र बाधित होणार आहे. सामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली बिल्डरांचे दुकान चालविण्याचा हा प्रकार आहे.
सरकारला सामान्यांसाठी घरेच बांधायची असतील तर म्हाडाच्या भूखंडावर बांधावीत. आजही म्हाडाजवळ २ हजार हेक्टर जमीन आहे. त्याशिवाय झोपडपट्ट्यांनी बळकावलेली अडीच हजार हेक्टर जमीन मोकळी करून त्यावरही सामान्यांसाठी घरे बांधता येणे शक्य आहे. मात्र, हे सर्व टाळून केवळ बिल्डर लॉबीच्या हितासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला
आहे. सामान्यांना या विकास आराखड्यातून कसलाच लाभ मिळणार नसल्याने काँग्रेसचा सदर विकास आराखड्यास तीव्र विरोध असणार असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

विनोद तावडेंची आमदारकी रद्द करा
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सची बोगस पदवी नमूद करून प्रचार केला. संत ज्ञानेश्वर विद्यापीठातून पदवी घेतल्याचे सांगत जनतेची दिशाभूल आणि फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे, यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिल्याचे निरुपम यांनी सांगितले.

आदर्श पाडणे हा उपाय नाही
आदर्शची जमीन संरक्षण विभागाची असल्याबाबत सरकारकडे ठोस पुरावे नाहीत. त्याचा सातबारा कोणाकडे आहे याबाबतही ठोस पुरावे नाहीत. आदर्शमध्ये सीआरझेडचे उल्लंघन झाल्याने इमारत पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतील तर अशा तब्बल ७०० इमारती मुंबईत आहेत. त्यामुळे आदर्श पाडणे हा काही उपाय नाही.

Web Title: ... this is where builders shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.