मनोहर कुंभेजकरमुंबई--आयुष मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड १९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमीओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे असे नमूद केले आहे.या अनुषंगाने सदर औषधाचे वितरण करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी प्राप्त करून घेण्यात आली आहे.अर्सेनिक अल्बम ३०च्या सुमारे २०लाख गोळ्या मोफत क्वारंटाईन सेंटरसह मोफत वितरण करण्यास सुरवात झाली आहे.पालिकेच्या के पश्चिम व जी उत्तर या वॉर्ड मधील नागरिकांना सदर औषधाचे वितरण कारण्यासंदर्भात पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.पद्मजा केसकर यांनी पत्र जारी केले आहे.
सदर पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, आम्हाला अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या मिळणार तरी कुठे अशी विचारणा नागरिक लोकप्रतिनिधींना करत आहे.आज सकाळ पासून आपल्याला किमान १० ते १५ नागरिकांनी सदर औषध कुठे मिळणार अशी विचारणा झाली अशी माहिती पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी लोकमतला दिली.तर अश्या प्रकारची विचारणाआपल्याकडे उत्तर मुंबईतील अनेक नागरिकांनी केल्याचे खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले,तर वर्सोव्याच्या आमदार डॉ.लव्हेकर यांनी सुद्धासकाळपासून आपल्याला या औषधाची विचारणा करणारे आज अनेक फोन आले असे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी सदर गोळ्या घेऊन जर नागरिक कोरोना होणार नाही म्हणून बाहेर फिरत राहिले तर याला जबाबदार कोण,सदर औषध देण्यासाठी महापौर,गटनेत्यांची,पालिका आयुक्तांची मान्यता घेतली आहे का?नागरिकांना या औषधाच्या वितरणाबद्धल आम्ही काय उत्तरे द्यायची ,सदर औषधाचे मोफत वितरण पालिका कसे करणार असे सवाल आपण डॉ.केसकर यांना केल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या.
या संदर्भात डॉ.पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की,सदर औषध हे आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार नागरिकांना पालिका उपलब्धते नुसार मोफत देणार आहे.सध्या आम्हाला होमिओपॅथी डॉक्टर सदर औषध उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.