Join us  

दीड लाख मतदार गेले कुठे?

By admin | Published: February 23, 2017 6:49 AM

यंदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गेल्या पालिका निवडणुकीपेक्षा चांगले मतदान झाले

सुशांत मोरे / मुंबईयंदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गेल्या पालिका निवडणुकीपेक्षा चांगले मतदान झाले. मात्र, असे असले तरी उच्चभ्रू वस्ती असलेल्या एच वेस्ट वॉर्डमध्ये मतदारांची पाठ आणि मतदार याद्यांतील घोळ, यामुळे दीड लाख मतदारांचे मतदान झालेच नसल्याचे समोर आले आहे. वांद्रे पश्चिम परिसरात ४५ टक्क्यांच्या आत, तर खार आणि सांताक्रूझ पश्चिममध्ये प्रभाग ९९ सोडता बाकी प्रभागांत मिळून ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाले. वांद्रे पश्चिम ते सांताक्रूझ पश्चिमपर्यंत असलेला एच वेस्ट वॉर्डमधील बहुतांश भाग हा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. या वॉर्डमध्ये एकूण २ लाख ९१ हजार मतदार आहेत. संपूर्ण एच वेस्टमध्ये २१ फेब्रुवारी रोजी सरासरी ५२ टक्के मतदान झाले. मात्र, एच वेस्टमधील वांद्रे पश्चिम परिसरात सर्वात कमी मतदान झाले असून, यातील प्रभाग क्रमांक १०० मध्ये येणाऱ्या पाली व्हिलेज, पटवर्धन पार्क, युनियन पार्क, पाली हिलमध्ये ४५.५७ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ वांद्रे तलाव, नॅशनल लायब्ररी, चिंबई व्हिलेज, भाभा हॉस्पिटल परिसरात ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग १०१ मध्ये ४५.३७ टक्के आणि प्रभाग १०२ मधील संतोषनगर, वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे बस डेपो, ओएनजीसी कॉलनी परिसरातही ४३.६३ टक्के मतदान झाले आहे. वांद्रे स्थानकाबाहेरील परिसर, तसेच चिंबईतील काही परिसर सोडला, तर संपूर्ण परिसरात उच्चभ्रूंची वस्ती आहे. हीच परिस्थिती खार आणि सांताक्रूझ पश्चिम परिसरातही दिसली. प्रभाग ९७ मध्ये खिरानगर, मुक्तानंद पार्क, नवयुग कॉलनी, एमएसईबी कॉलनी, सांताक्रूझ बस डेपो, तर प्रभाग ९८ मध्ये वेलिंग्टन जिमखाना, डॉ. आंबेडकरनगर, खार जिमखाना, रोटरी पार्क असून, या दोन्ही प्रभागांत ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची नोंद आहे. एच वेस्ट वॉर्डमधील प्रभाग ९९ मध्ये मतदान हे ५४ टक्क्यांपर्यंत गेले. येथे खारदांडा, कोळीवाडा, दांडा आणि गोविंदनगर परिसरात उच्चभ्रूंबरोबरच मध्यमवर्गीय वस्तीही चांगलीच आहे. एकूणच एच वेस्टमधील सहा प्रभागांतील १ लाख ५० हजार ६३९ मतदारांकडून मतदान झालेले नसल्याचे समोर आले आहे. प्रभाग झालेले न झालेले मतदानमतदान९७२५,२१६२४,३५६९८२२,५७१२१,७१३९९२४,२२६२०,२४३१००२२,०४३२६,३२७१०१२३,५६३२८,३७०१०२२२,९३५२९,६३०वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ पूर्व या एच ईस्ट वॉर्डमध्ये एकूण ५८ टक्के मतदान झाले. यात प्रभाग ८९ मध्ये ६१ टक्के तर प्रभाग ९५ मध्ये ५८ टक्के मतदान झाले आहे.