Join us  

निधी गेला कुठे? राष्ट्रवादीच्या विरोधातील आमदारांनाही भरघोस निधी

By दीपक भातुसे | Published: July 25, 2023 5:56 AM

ठाकरे गट, काँग्रेस आमदारांची निराशा

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतलेल्या अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मांडलेल्या पुरवणी मागण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. भाजपचे गंगापूर विधानसभेचे आमदार प्रशांत बब यांना सर्वाधिक ७४२ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे समोर आले आहे. मात्र, विरोधक असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांच्या वाट्याला निराशा आली आहे. 

जयंत पाटलांच्या मतदारसंघासाठी ५८० कोटी रुपये

विशेष म्हणजे अजित पवार यांचे ज्यांच्याबरोबर पक्षात असतानाही पटले नाही अशा जयंत पाटील यांच्या वाळवा या मतदारसंघात तब्बल ५८० कोटी ३१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच, सत्ताधारी भाजप, शिंदे गटाच्या आमदारांनाही भरघोस निधी देण्यात आलेला आहे.  

राष्ट्रवादी (शरद पवार गट)

जयंत पाटील, वाळवा     ५८० कोटी राजेश टोपे, घनसावंगी     २९३ कोटीरोहित पवार, कर्जत-जामखेड     २१० कोटीसंदीप क्षीरसागर, बीड    ३५ कोटी

राष्ट्रवादी (अजित पवार गट)

दत्ता भरणे, इंदापूर     ४३६ कोटीमकरंद पाटील, वाई-खंडाळा-महाबळेश्वर    २९१ कोटीकिरण लहामटे, अकोले    ११६ कोटीदिलीप वळसे-पाटील, आंबेगाव     ९६ कोटीअजित पवार, बारामती    ७३ कोटीअदिती तटकरे, श्रीवर्धन     ४० कोटीमाणिकराव कोकाटे, सिन्नर     ३३ कोटीछगन भुजबळ, येवला    ३१ कोटीहसन मुश्रीफ, कागल    २२ कोटीधनंजय मुंडे, परळी    २१ कोटीप्रकाश साळुंखे, गेवराई    १३ कोटी

शिंदे गट

अब्दुल सत्तार, सिल्लोड     ५८ कोटीभरत गोगावले, महाड     १३४ कोटीमहेंद्र दळवी, अलिबाग     ४५ कोटीमहेंद्र थोरवे, कर्जत     ४८ कोटीसंदीपान भुमरे, पैठण     २९ कोटीसंतोष बांगर, कळमनुरी     १९ कोटी

भाजप

प्रशांत बब, गंगापूर    ७४२ कोटीमहेश बालदी, उरण     २८ कोटी

माकप

विनोद निकोले, डहाणू     ७६ कोटीकाँग्रेसच्या १५ आमदारांना शून्य निधी

निधी वाटपात काँग्रेसच्या १५ आमदारांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही, तर २० आमदारांना केवळ १ ते ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांच्या तोंडालाही निधी वाटपात पाने पुसण्यात आली आहेत.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसअजित पवार