कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता...

By admin | Published: February 9, 2016 04:19 AM2016-02-09T04:19:49+5:302016-02-09T04:19:49+5:30

प्रसिद्ध शायर निदा फाजली यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील आणखी एक तारा निखळला. हृदयाला भिडणारी शायरी करणाऱ्या निदा फाजलींचे चित्रपट क्षेत्रातही मोठे योगदान आहे.

Where ever nobody gets perfect ... | कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता...

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता...

Next

मुंबई : प्रसिद्ध शायर निदा फाजली यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील आणखी एक तारा निखळला. हृदयाला भिडणारी शायरी करणाऱ्या निदा फाजलींचे चित्रपट क्षेत्रातही मोठे योगदान आहे.
‘रजिया सुल्तान’ चित्रपटापासून त्यांच्या सिनेकारकीर्दीला सुरुवात झाली. तेव्हापासून सूर व सरफरोशपर्यंत (आमिर खान) अनेक चित्रपटांसाठी गीते लिहिली. कमाल अमरोही यांच्या ‘रजिया सुल्तान’ (धर्मेंद्र व हेमामालिनी) चित्रपटाचे जां निसार अख्तर हे मूळ गीतकार होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याने रजियाची दोन गीते लिहिण्याची जबाबदारी ‘निदा साहब’ (चित्रपटसृष्टी आणि साहित्य वर्तुळातील लोक प्रेमाने त्यांचा याच नावाने उल्लेख करीत) यांच्याकडे आली. रजिया सुल्तानमधील त्यांचे गीत ‘तेरा हीज्र मेरा नसीब है, तेरा गम ही मेरी हयात आहे....’ या गीताच्या यशाने त्यांना रातोरात ओळख मिळवून दिली. त्यानंतर निदा साहब यांनी मागे वळून पाहिले नाही.
‘आप तो ऐसे न थे’ पासून ‘इस रात की सुबह नहीं’ आणि ‘सूर’पर्यंत निदा साहब यांच्या शब्दांनी सर्वांवरच गारुड केले. ‘आहिस्ता - आहिस्ता’ या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता... कहीं जमीं तो कहीं आसमां नहीं मिलता...’ या गीताची जादू तर आजही कायम आहे. ‘तरकीब’ या चित्रपटातील ‘किस का चेहरा देखूं, अब तेरा चेहरा देखकर’ हे त्यांचे गाणेही लोकप्रिय ठरले. सूर चित्रपटातील ‘आ भी जा...’ आणि सरफरोशचे ‘होश वालों को खबर क्या....’ हे गीतही प्रचंड लोकप्रिय ठरले. ‘आप तो ऐसे न थे’ या चित्रपटातील ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ या गीतानेही लोकप्रियतेचे शिखर गाठले. २००३मध्ये सूर चित्रपटातील ‘आ भी जा...’ या गीतासाठी निदा साहब यांना स्क्रीन अवॉर्डने गौरविण्यात आले होते.
त्यांच्या निधनाने बॉलीवूडजगत हळहळले असून अनेक ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, गायक विशाल दादलानी, रोशन अब्बास, हंसल मेहता, दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी टिष्ट्वटर आणि फेसबुकवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

फाजली यांची साहित्यसंपदा
लोकप्रिय गीते...
तेरा ही- मेरा नसीब है, तेरा गम मेरी हयात है (चित्रपट - रझिया सुलतान)
आयी जंजीर की झन्कार, खुदा खैर कर
(चित्रपट - रझिया सुलतान)
होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है
(चित्रपट - सरफरोश)
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
(चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता)
तू इस तरह से मेरी जिÞंदगी में शामिल है
(चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता)
चुप तुम रहो, चुप हम रहें
(चित्रपट - इस रात की सुबह नहीं)
दुनिया जिसे कहते हैं, मिट्टी का खिलौना है (गझल)
हर तरफ हर जगह बेशुमार आदमी (गझल)
अपना गम लेके कहीं और न जाया जाये (गझल)
टी.व्ही. मालिका ‘सैलाब’चे शीर्षकगीत

काव्यसंग्रह...
लफ़्जों के फूल
मोर नाच
आँख और ख़्वाब के दरमियाँ
खोया हुआ सा कुछ (१९९६) (१९९८ साली त्यांना या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले)
आँखों भर आकाश
सफर में धूप तो होगी

----------------------------------
अष्टपैलू गीतकार हरपला
प्रख्यात शायर निदा फाजली यांनी अतिशय सोप्या शब्दांत आशयघन अशा गीतरचना केल्या. त्यांची अनेक गीते रसिकांच्या स्मरणात चिरंतन राहतील. ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता’, ‘होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है’ अशी काही अजरामर गीते त्यांच्यातील अष्टपैलू प्रतिभेची प्रचिती आणून देणारी आहेत. त्यांनी काव्यसंग्रह, आत्मकथा, संपादित पुस्तके अशी दर्जेदार साहित्यनिर्मिती केली. विशेषत: नामांकित शायरांवरील संपादित लिखाण हे साहित्यक्षेत्रातील त्यांचे मोठे योगदान आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

साहित्यातील कोहिनूर
महान शायर निदा फाजली हे असे एक रचनाकार होते, ज्यांच्या एकेका शब्दात जीवनातील सत्याचे दर्शन घडायचे. जीवनातील प्रत्येक पैलू, समाजातील प्रत्येक घडामोड, मनुष्याचा संघर्ष, आर्थिक-सामाजिक असमानता असो की राष्ट्रीय एकता- समरसता अथवा सांप्रदायिक सद्भाव असो निदा फाजली यांनी आपल्या साहित्यकृतीतून प्रेरक असा संदेश दिला.
निदाजी नेहमी सामान्यांच्या हृदयाला हात घालणाऱ्या शैलीत आपले मत मांडायचे. त्यांच्या रचनांमध्ये सर्वसामान्यांसाठी आशावाद झळकत होता. आपण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरवावे असा संदेश ते नेहमी देत असत. त्यांनी केवळ साहित्यालाच नव्हे तर बॉलिवूडलाही आपल्या अनमोल गीतांनी समृद्ध केले. निराला, सुमित्रानंदन पंत, गोपालदास नीरज, मुक्तिबोध, शिवमंगलसिंग सुमन, मोहन राकेश, बाबा नागार्जुन, मजरुह सुल्तानपुरी, मिर्झा गालिब, इक्बाल, साहिर लुधियानवी, कैफी आझमी, मीर तकी मीर, शकील बदायूँनी यासारख्यांच्या साहित्य परंपरेला फाजली यांनी आपल्या उत्कृष्ट रचनांतून आणखी समृद्ध केले. जीवन नश्वर आहे हे चिरंतन सत्य अतिशय सरळसोप्या भाषेत मांडताना ते म्हणतात...
धूप में निकलो घटाओं में नहाकर देखो
जिंदगी क्या है किताबों को हटाकर देखो
फासला नजरों का धोखा भी हो सकता है
वो मिले ना मिले, हाथ बढ़ाकर तो देखो
आपल्या शब्दांना आयुष्याचा आरसा बनविणाऱ्या साहित्यातील या कोहिनूरच्या स्मृतींना शत: शत: प्रणाम.
- खा. विजय दर्डा, चेअरमन,एडिटोरियल बोर्ड, लोकमत वृत्तपत्र समूह

Web Title: Where ever nobody gets perfect ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.