जेनेरिक औषधे मिळणार कोठे?

By admin | Published: March 14, 2016 02:19 AM2016-03-14T02:19:06+5:302016-03-14T02:19:06+5:30

अनेक औषधांच्या किमती जास्त असल्याने सामान्यांना ही औषधे घेणे परवडत नाही. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील अनेक जण पैशांअभावी औषधे घेणे टाळतात

Where to get generic medicines? | जेनेरिक औषधे मिळणार कोठे?

जेनेरिक औषधे मिळणार कोठे?

Next

मुंबई : अनेक औषधांच्या किमती जास्त असल्याने सामान्यांना ही औषधे घेणे परवडत नाही. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील अनेक जण पैशांअभावी औषधे घेणे टाळतात. सर्वांना औषधे उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ‘जनऔषधी’ योजना सुरू केली, पण डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक औषध लिहून दिल्यास, रुग्णांना ही औषधे मिळणार कुठून? असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उपस्थित केला आहे.
सर्वांना वाजवी दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात तीन हजार जेनेरिक औषधांची दुकाने सुरूकरण्याची तरतूद करण्यात आली. ही बाब चांगली आहे, पण या दुकानांची संख्या अपुरी आहे. डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक औषध लिहून दिल्यावर, रुग्णाला औषध कुठून उपलब्ध होणार? याची स्पष्टता अजूनही आलेली नाही. त्यामुळे आम्ही सरकारला पत्र पाठवल्याची माहिती आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी दिली.
जेनेरिक औषधे वाजवी दरात रुग्णांना मिळायला हवीत. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
रुग्णाला वाजवी दरात औषधे मिळावीत, हेच आम्हाला वाटते, पण राज्यात १०० दुकाने जेनेरिक औषधांची असल्यास ही संख्या अपुरी असल्याचेही डॉ. लेले यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Where to get generic medicines?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.