कोरोनापासून बचाव करण्यासाठी घर कुठे आहे? बेघरांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 03:13 AM2020-03-18T03:13:43+5:302020-03-18T03:14:00+5:30

पदपथांवर राहणारी २५ हजार कुटुंबे, तसेच ५७ हजार ४१६ बेघर यांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॅसीचे जगदीश पाटणकर यांनी केला आहे.

Where is the house to defend against Corona? The question of the homeless | कोरोनापासून बचाव करण्यासाठी घर कुठे आहे? बेघरांचा सवाल

कोरोनापासून बचाव करण्यासाठी घर कुठे आहे? बेघरांचा सवाल

Next

मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी सरकार सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र, पदपथांवर राहणारी २५ हजार कुटुंबे, तसेच ५७ हजार ४१६ बेघर यांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रॅसीचे जगदीश पाटणकर यांनी केला आहे. ज्यांच्याकडे घरच नाही, जे पदपथावर, रस्त्यावर बेघर म्हणून राहत आहेत, अशांनी कुठे राहावे? मुंबईत शहरी बेघरांकरिता १२५ निवारे बनविणे आवश्यक होते, पण मुंबई महानगरपालिका फक्त २३ निवारे चालवित आहे. परिणामी, यावर उपाययोजना करावी, असे म्हणणे पाटणकर यांनी मांडले आहे.
 

Web Title: Where is the house to defend against Corona? The question of the homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.