Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे कुठे आहेत?... त्यांना सांगून ठेवलंय ना?; उद्धव ठाकरेंचा विधानभवनातील व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 09:42 AM2022-06-21T09:42:02+5:302022-06-21T10:54:08+5:30

Where is Eknath Shinde? ... Have you told him ?; Video of Uddhav Thackeray in Vidhan Bhavan : एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते एकनाथ शिंदेंची विचारणा करताना दिसून येतात.

Where is Eknath Shinde? ... Have you told him ?; Video of Uddhav Thackeray in Vidhan Bhavan | Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे कुठे आहेत?... त्यांना सांगून ठेवलंय ना?; उद्धव ठाकरेंचा विधानभवनातील व्हिडीओ

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे कुठे आहेत?... त्यांना सांगून ठेवलंय ना?; उद्धव ठाकरेंचा विधानभवनातील व्हिडीओ

Next

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील असून ते गुजरातच्या सुरतमध्ये असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली असून शिवसेना आमदार निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच एकनाथ शिंदे Eknath Shinde संपर्कात असतील, असे गोऱ्हे यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते एकनाथ शिंदेंची विचारणा करताना दिसून येतात.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. मात्र, या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं. त्यानंतर, राज्याच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला असून विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर, भाजप नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचंही समजते. विशेष म्हणजे विधानपरिषद निवडणूक प्रकियेतही एकनाथ शिंदे जास्त सक्रीय दिसून आले नाहीत. त्यातच, सोमवारी मुख्यमंत्री विधानभवनात आले असताना त्यांनी एकनाथ शिंदेंची विचारणा केली होती, याचा एका वृत्तवाहिनीची व्हिडिओ समोर आला आहे.  

व्हिडिओत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसत असून ते एकनाथ शिंदेंबद्दल विचारत आहेत. उद्धव ठाकरेंसमवेत विधानभवनात अनिल देसाई आणि इतर शिवसेना नेते चालत होते. त्यावेळी, उद्धव ठाकरेंनी विचारणा केली. एकनाथ शिंदे कुठे आहेत, त्यांना सांगितलंय ना? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला होता. दरम्यान, एकनाथ शिंदे विधानपरिषेदच्या मतदानासाठी उशिरा विधानभवनात पोहोचले होते. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी भेटही झाली नसल्याचे समजते.  

शिंदे मतदानालाही उशिरा आले

एकनाथ शिंदे मतदानासाठी देखील उशिरा सभागृहात आले होते. तर, मतमोजणीवेळीही ते उपस्थित नव्हते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, असे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले. तसेच, विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली असून काँग्रेसचीही मतं शिवसेनेनं फोडली आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, खदखद आहे, असेही भातखळकर यांनी म्हटले.

लवकरच संपर्कात येतील - निलम गोऱ्हे

''एकनाथ शिंदेंना आपण अनेक वर्षे ओळखतो. पक्षासाठी ते सदैव कार्यमग्न असतात, परिश्रम घेत असतात. विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी मिळूनच याबाबतचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे, काही वेळातच एकनाथ शिंदे संपर्कात असतील,'' अशी ग्वाही शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दिली आहे. 'अगदी छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल गैरसमज पसरवू नयेत, कारण शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार निवडून आले आहेत. पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतले आहेत, त्यामध्ये जीवाला जीव देऊन एकनाथ शिंदेंनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे, माझी सर्वांना विनंती आहे की, हवेतील बातम्या पसरवू नयेत,' असेही निलम गोऱ्हेंनी म्हटले. 

Read in English

Web Title: Where is Eknath Shinde? ... Have you told him ?; Video of Uddhav Thackeray in Vidhan Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.