राज कुंद्राला कुठे समर्थन, तर कुठे कठोर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:13+5:302021-07-22T04:06:13+5:30

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यात काहींनी त्यांची बाजू ...

Where support for Raj Kundra, where demand for strict action | राज कुंद्राला कुठे समर्थन, तर कुठे कठोर कारवाईची मागणी

राज कुंद्राला कुठे समर्थन, तर कुठे कठोर कारवाईची मागणी

Next

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यात काहींनी त्यांची बाजू घेत कारवाई चुकीची असल्याचे म्हटले; तर काहींनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

एका व्हिडिओद्वारे मिका सिंगने राज कुंद्रा यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ॲपबद्दल फारसे काही माहीत नाही. मी एक ॲप पाहिले होते. ते खूपच साधे होते. त्यात असे काहीच नव्हते. माझ्या अनुभवावरून राज कुंद्रा एक चांगला माणूस आहे. पण खरे काय आहे हे न्यायालयच ठरवील.

तर दुसरीकडे पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेली मॉडेल गहेना वशिष्ठ म्हणे याच प्रकरणात राज कुंद्रा आणि मलाही अटक करण्यात आली आहे. आमचीही चौकशी सुरू आहे. अशात कुंद्रा यांच्या कंपनीत काय बनविले जाते हे मला माहीत आहे. त्यांच्या अ‍ॅपसाठी निर्मित ३ चित्रपटांमध्ये मी नायिका म्हणून काम केले आहे. त्यांनी मला कधीही, काहीही करण्यास भाग पाडले नाही. मी केलेल्या कामाचा मला मोबदलाही देण्यात आला. ते चित्रपट खूप चांगले रिलीज झाले होते आणि त्यांपैकी कोणतेही चित्रपट हे अश्लील चित्रपट नव्हते. सध्या गहेना ही जामिनावर बाहेर आहे.

...

राज कुंद्रा कारागृहात सडो...

मलाही या ॲपसाठी काम करण्याबाबत राज कुंद्राने मेसेज केला होता. तेव्हा मलाही धक्का बसला. अशात देवाला प्रार्थना आहे की. ही व्यक्ती कारागृहात सडो, अशी भावना प्रसिद्ध यूट्यूबर पुनीत कौरने तिच्या इन्स्टाग्रामवरून व्यक्त केली.

.....

शिल्पा शेट्टी आणि मुलांची पूनमला चिंता

या प्रकरणानंतर, शिल्पा शेट्टी आणि मुलांची चिंता वाटत आहे. त्यांना काय वाटत असेल. तसेच २०१९ मध्ये मीदेखील कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. या प्रकरणाचाही तपास सुरू असल्यामुळे यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र मला न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे नमूद केले, अशी प्रतिक्रिया मॉडेल पूनम पांडे हिने व्यक्त केली.

....

...म्हणून चित्रपट सृष्टीला मी गटार म्हणते !

यात कंगनानेही इंस्टाग्रामवरून आपले मत मांडताना म्हटले, यासाठीच मी चित्रपटसृष्टीला गटार बोलते. चमकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते. मी माझ्या आगामी प्रॉडक्शनद्वारे बॉलिवूडचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार आहे.

Web Title: Where support for Raj Kundra, where demand for strict action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.