राज्यातील समुद्रात कचरा कुठून टाकण्यात येतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:38+5:302021-07-11T04:06:38+5:30

उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा राज्यातील समुद्रात कचरा कुठून टाकण्यात येतो? उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा लोकमत न्यूज नेटवर्क ...

Where is the waste dumped in the sea of the state? | राज्यातील समुद्रात कचरा कुठून टाकण्यात येतो?

राज्यातील समुद्रात कचरा कुठून टाकण्यात येतो?

googlenewsNext

उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा

राज्यातील समुद्रात कचरा कुठून टाकण्यात येतो?

उच्च न्यायालयाची राज्य सरकारकडे विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील समुद्रात कचरा कुठून टाकण्यात येतो? आणि यास कशाप्रकारे अटकाव घालण्यात येऊ शकतो? हे स्पष्ट करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले.

तौक्ते वादळानंतर राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर विशेषतः मरिन ड्राइव्हवर जमा झालेल्या कचऱ्याच्या वृत्ताची उच्च न्यायालयाने दखल घेत स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली.

मुंबई शहरातील सातपैकी सहा समुद्रकिनारे नियमित स्वच्छ करण्यात येतात. अनेक साइनबोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्यावर कचरा टाकू नये, यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे, असे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला सांगितले.

हे सर्व ठीक आहे पण सर्व कचरा समुद्रात जातो कुठून? त्याचे स्रोत काय? पुढील सुनावणीला तुम्ही याबाबत सर्व माहिती द्या आणि याला आळा कसा घालू शकतो हेही सांगा, असे निर्देश उच्च न्यायालयाने कुंभकोणी यांना दिले.

अनेक ठिकाणाहून समुद्रात कचरा सोडला जात असेल. तुम्ही मिठी नदीचेच उदाहरण घ्या...सर्व कचरा याच नदीत सोडण्यात येतो. त्यामुळे आम्हाला संपूर्ण माहिती द्या. आता ही वार्षिक समस्या झाली आहे, असे म्हणत न्या. कुलकर्णी यांनी या याचिकेवर सोमवारी सुनावणी ठेवली आहे.

राज्य सरकारने न्यायालयात पाच पाणी टिपण सादर केले. योग्य यंत्रणेचा वापर करून समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यात येतात. लोकांनी समुद्रात कचरा टाकू नये, यासाठी जागोजागी कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहेत. खाडी, नाले आणि नद्यांजवळ राहणारे झोपडपट्टीधारक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. पावसाळ्यात शहर तुंबल्यावर रस्त्यावरील कचराही नदीत जातो आणि तो कचरा समुद्रात जातो, असे सरकारने सादर केलेल्या टिपणात म्हटले आहे.

Web Title: Where is the waste dumped in the sea of the state?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.