Corona Vaccination Mumbai: मुंबईत मुलांचे लसीकरण कुठे कुठे होणार; जाणून घ्या प्रभागानुसार केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 08:36 AM2022-01-03T08:36:35+5:302022-01-03T08:36:55+5:30
मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात. महापालिका सज्ज; १५ ते १८ वर्षे वयोगटाचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गत १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची मोहीम सोमवारपासून (दि. ३) मुंबईत सुरू होत आहे. त्यासाठी एकूण नऊ लसीकरण केंद्र निर्देशित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर महापालिकेच्या शाळांमधील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसह इतरही मुलांना लस देण्यात येणार आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुल कोविड लसीकरण केंद्रातून या मोहिमेचा ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शुभारंभ होणार आहे.
लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन या लसीचा वापर करण्यात येणार आहे. यात महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसह इतरही मुलांचे विनामूल्य लसीकरण करण्यासाठी मुंबईत एकूण नऊ समर्पित केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. पालकांनी पाल्यांची नोंदणी करून घ्यावी आणि पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे.
लसीकरणानंतर ताप येणे. हात दुखणे अशी सौम्य लक्षणे क्वचित प्रसंगी आढळून येऊ शकतात, अशा वेळी घाबरून न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषध घ्यावीत. त्याचप्रमाणे इतर काही त्रास उद्भवल्यास नजीकच्या महापालिका रुग्णालयात संपर्क साधावा.
एकूण नऊ कोविड लसीकरण केंद्रे निर्देशित
nमनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसह इतर मुलांनाही विनामूल्य लस
nऑनलाइन आणि ऑफलाइन
नोंदणीचीदेखील सोय
n२००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र राहतील.
नोंदणीची सोय
लसीकरणासाठी विद्यार्थ्यांना केंद्रावर थेट येऊन नोंदणी (ऑनसाइट / वॉक इन) करून लस घेता येईल. ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून नोंदणीची सोय उपलब्ध राहणार आहे.
लसीकरण केंद्रे
nए, बी, सी, डी, ई या पाच प्रशासकीय विभागांसाठी
भायखळामधील रिचर्डसन क्रूडास भायखळा कोविड लसीकरण केंद्र
nएफ/उत्तर, एल, एम/पूर्व, एम/पश्चिम या चार विभागांसाठी शीव येथील सोमय्या मैदानावरील जम्बो कोविड लसीकरण केंद्र
nएफ/ दक्षिण, जी/ दक्षिण, जी/उत्तर या तीन विभागांसाठी वरळीतील एनएससीआय डोम जम्बो कोविड लसीकरण केंद्र
nएच/पूर्व, के/पूर्व, एच/पश्चिम या तीन विभागांसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र
nके/ पश्चिम, पी/ दक्षिण या दोन विभागांसाठी गोरेगाव (पूर्व) मधील नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र
nआर/ दक्षिण, पी/ उत्तर या दोन विभागांसाठी मालाड (पश्चिम) मधील मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
nआर/मध्य, आर/उत्तर विभागांसाठी दहिसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र
nएन, एस विभागांसाठी कांजूरमार्ग (पूर्व) मधील क्रॉम्प्टन ॲण्ड ग्रीव्हस् जम्बो कोविड लसीकरण केंद्र
nटी विभागासाठी मुलुंड (पश्चिम)मधील रिचर्डसन क्रूडास मुलुंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
nपरळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठीदेखील लसीकरण केंद्र आहे.