Join us

तुम्ही जिथे पोहोचला नाहीत, तिथे मी जाऊन आलोय, घराबाहेर पडा म्हणणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 1:41 PM

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संबोधित केले. यावेळी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुंबई - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संबोधित केले. यावेळी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका करणाऱ्या भाजपासह अन्य विरोकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सणसणीत टोला लगावला आहे.कोरोनाकाळात मी गरज नसेल तर बाहेर पडू नका, असे आवाहन मी केले आहे. मात्र मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावे अशी मागणी केली जात आहे. मात्र तुम्ही जिथे पोहोचला नाही अशा ठिकाणी मी जाऊन आलो आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिथे पोहोचलो आहे. अनेकांशी चर्चा केली आहे, करत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंच्या संबोधनामधील महत्त्वाचे मुद्दे- कोरोनाकाळात सणवार साधेपणाने साजरे केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार- जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय- गेल्या काही काळात आपण मिशन बिगीन अगेन याअंतर्गत व्यवहार सुरू करण्यात येत आहेत- आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका, बाहेर पडताना मास्क लावा, सोशल डिस्टंस पाळा- प्रत्येक खासदार, आमदार, सरपंच, नगरसेवक यांना आपापल्या भागांची जबाबदारी घ्यावी- पुढच्या महिनाभरात प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी पथक जाईल 

- आता राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव नाही तर हमखास भाव देणार

  राजकारण करणाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्रिपदाचा मुखवटा काढून बोलणार

  सरकार मराठा समाजासोबत, कृपया आंदोलन करू नका 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकार