मुंबई : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. ३ जानेवारी रोजी महाराष्टÑ बंद पुकारण्यात आला होता. सोशल मीडियावरील अफवांमुळे हे प्रकरण जास्तच तापले. सध्या समाजातील वातावरण शांत झाले असले, तरी व्हॉट्सअॅपवर अजूनही ‘कोल्डवॉर’ सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅपवरील डीपीच्या माध्यमातून हे वॉर सुरू आहे. अनेकांनी डीपीमध्ये भगवा किंवा निळा झेंड्याचा फोटो ठेवला आहे.अनेक तरुण अन्य तरुणांना डीपीमध्ये भगव्या झेंड्याचा, निळ्या झेंड्याचा फोटो ठेवा, असे आवाहन करीत आहेत. या मेसेजेसमुळे अनेकांचे डीपी बदललेले दिसून येत आहेत. काही तरुण तिरंग्याचा डीपी ठेवावा म्हणूनही मेसेजेस करत आहेत. ‘ते तुम्हाला विशिष्ट रंगांचे झेंडे दाखवतील, तुम्ही मात्र तिरंग्यावर अडून राहा’ अशा आशयाचे मेसेजेसही मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅपवर सध्या फिरत आहेत.सोशल मीडियावरील अफवांवर, दिलेल्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सातत्याने पोलिसांकडून केले जात आहे, परंतु तरीही काही समाजकंटक हा प्रकार करत आहेत. ठरावीक जाती-धर्मांमध्ये द्वेश पसरविणाºया प्रकारांचे सध्या सोशल मीडियावर पीक आलेले आहे.
‘कोणता झेंडा घेऊ हाती?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 7:14 AM