उद्या लोकल कोणत्या मार्गावर वळवणार? मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 09:42 AM2023-12-23T09:42:54+5:302023-12-23T09:42:54+5:30
MEGA BLOCK December 24, 2023: रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत
परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
हार्बर रेल्वे
कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ वाजेपर्यंत
परिणाम : पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
वेळ : रविवारी मध्य रात्री १२:३५ ते दुपारी पहाटे ४:३५ वाजेपर्यंत
परिणाम : विरार/वसई रोड ते बोरिवली / गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील. विरारकडे जाणाऱ्या सर्व डाऊन धीम्या लोकल सेवा
गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील.