Sanjay Raut: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या 'लेटरबॉम्ब'नंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असताना शिवेसनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेUddhav Thackeray पूर्णपणे प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचं स्पष्ट केलं आहे. भाजपकडून केंद्रीय तापस यंत्रणांचा गैरवापर करुन नाहक त्रास दिला जातोय हेच प्रताप सरनाईक यांच्या पत्राचं सार असून त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना त्रास दिला जातोय हे स्पष्ट दिसून येतं. भाजपशी जुळवून घेण्याचा त्यांनी दिलेला सल्ला हे त्यांचं त्रासातून आलेलं वैयक्तिक मत आहे. पण एक पक्ष म्हणून भूमिका घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांनाच आहे. आमचं शरीर आणि काळजी दोन्हीही वाघाच्या काळजाचं आहे त्यामुळे शिवसेना पक्षा आणि स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्या पाठिशी ठाम उभं आहे, असं संजय राऊतSanjay Raut यांनी यावेळी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावेळी भाजपवर शेलक्या शब्दांत हल्लाबोल चढवला. "विरोधकांकडून कितीही प्रयत्न झाले तरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष उत्तमपणे काम करणार आहे. आमदारांना नाहक त्रास देण्याचं काम भाजपनं पश्चिम बंगालमध्येही केलं. पण महाराष्ट्रात असं चालणार नाही. तुम्ही फार फार तर काय कराल आम्हाला तुरुंगात टाकाल. पण त्यासाठी आम्ही तयार आहोत. आमचं काळीज आणि शरीर दोन्ही वाघाचं आहे. नुसतं शरीर वाघाचं आणि काळीज उंदारंचं असं आमचं नाही", असा टोला संजय राऊत यांनी यावेळी भाजपला लगावला.
'योग दिना'वरुन साधला निशाणाआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योगा अॅपच लॉंचिंग केलं. भाजपकडून देशभरात विविध योगा कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. योग दिनाचं औचित्य साधून तुम्ही विरोधकांना कोणता योग सुचवाल?, असं संजय राऊत यांना विचारलं असता. संजय राऊत यांनी जाता जाता क्षणार्धात... 'शवासन' असं एका शब्दात उत्तर देऊन भाजपला टोला लगावला.
महाविकास आघाडी देशासाठी उदाहरणआघाडी कशी असावी याचं महाविकास आघाडी हे संपूर्ण देशासाठी उत्तम उदाहरण आहे. महाविकास आघाडी ही आदर्श समन्वयाचं उदाहरण आहे. महाराष्ट्रात सत्तेचा उत्तम फॉर्म्युला सुरू आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम समन्वय साधून सरकार चालवत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.