गांधी पुन्हा समजून घेताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 03:10 AM2018-10-02T03:10:05+5:302018-10-02T03:10:30+5:30

याविषयी, विल्सन महाविद्यालयाचा विद्यार्थी रौनक शेखावत याने सांगितले की, साधारण दीड वर्षापूर्वी गांधी शांती परीक्षा दिली, तो अनुभव वेगळा होता. लहानपणापासून मुंबई सर्वोदय मंडळ हाकेच्या अंतरावर

 While grasping of mahatma Gandhi ... | गांधी पुन्हा समजून घेताना...

गांधी पुन्हा समजून घेताना...

Next

गेल्या काही वर्षांत इंटरनेटच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईत संवादच हरवलेला आहे. तरुणाईच्या चैनविलासी प्रवृत्तीमुळे त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी आणि भान कमी होत चालल्याचे दिसून येते. बऱ्याचदा ही पिढी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असलेली दिसून येते. महात्मा गांधीजींनी मांडलेल्या कृतीयुक्त शिक्षणाला आजच्या तरुणांनी तिलांजली दिलीय की काय, अशी शंका येते. महात्मा गांधीजींना अपेक्षित असणारा तरुण घडणे आज आवश्यक आहे. आजच्या तरुणांनी व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधणे आवश्यक आहे. हेच महात्मा गांधीजींना अपेक्षित होते, मात्र ते आज मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही. संयत, शांती, आत्मनिर्भरता, विवेकनिष्ठा, शुद्ध चारित्र्य निर्मितीसाठी गांधी विचार महत्त्वाचे आहेत, हे आजच्या तरुणांना समजणे गरजेचे आहे. गांधी विचार, जीवन व कार्यावर तरुणपिढीने आत्मचिंतन केले पाहिजे.

याविषयी, विल्सन महाविद्यालयाचा विद्यार्थी रौनक शेखावत याने सांगितले की, साधारण दीड वर्षापूर्वी गांधी शांती परीक्षा दिली, तो अनुभव वेगळा होता. लहानपणापासून मुंबई सर्वोदय मंडळ हाकेच्या अंतरावर असल्याने बाबा घेऊन जायचे. त्या वेळी त्याचे इतके महत्त्व नव्हते, मात्र मोठे झाल्यानंतर आता गांधी विचारांविषयी अधिक वाचले. त्यानंतर स्वभावात आपोआपच विचार रुजत गेले. त्यामुळे खूप संयमीपणा आला आहे, हेसुद्धा जाणवले.
पीएच.डी. करणाºया सौरभी कांते हिने सांगितले की, ‘माझे सत्याचे प्रयोग’ मी वाचले आहे. पण त्यानंतर गांधीजींच्या साहित्याशी संबंध आलेला नाही. मात्र खरेच आताच्या तरुणाईला गांधीजींच्या दिशा दाखविणाºया विचारांची गरज आहे.

आजच्या काळात सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला खºया अर्थाने गांधीजींच्या विचारांची गरज आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेला ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस’ केवळ भारतातच नव्हेतर, जगभर साजरा होतो. त्यामुळे ऐहिक आणि भौतिक सुखाच्या आहारी जाणाºया तरुण पिढीला गांधी विचारांची गरज आहे. आजच्या १५०व्या गांधी जयंतीनिमित्त तरुणाईच्या दृष्टिकोनातून ‘गांधीजी’ जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...

बापूजींचे ‘स्वच्छ भारत’ हे स्वप्न होते, ती आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. गांधीजींची विचारसरणी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करत आहे. ते आमचे आदर्श आहेत. आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो. एनएसएसच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
- दिव्या पोंगडे,
डॉ. बी.एम.एन. कॉलेज आॅफ होम सायन्स.

महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना जागृत केले. एनएसएसमध्ये काम करत असताना त्यांच्या स्वच्छतेसंबंधित विचारांनी आम्ही प्रेरित झालो होतो. ‘आपले शरीर व मन अस्वच्छ असेल तर आपल्याला कधीच परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही,’ असे थोर विचार त्यांनी मांडले. मात्र, जर माणसे मनाने स्वच्छ असतील, तरच आपले शहर व परिसर स्वच्छ राहील. आम्ही एनएसएस कॅम्पमधून घर व परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. एनएसएसमध्ये गांधी विचार रुजविले जातातच, मात्र हे विचार भविष्यातही समाजात वावरताना उपयोगी ठरतात.
- मयूर पवार, साठ्ये महाविद्यालय.
 

Web Title:  While grasping of mahatma Gandhi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.