परराज्यातून येणाऱ्यांची तपासणी करतांना महापालिकेचे ७ जण कोरोनाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 03:11 PM2020-09-15T15:11:59+5:302020-09-15T15:12:58+5:30
गणेशोत्सवानंतर आणि अनलॉकची पुढील टप्पा सुरु झाल्यानंतर परराज्यातून येणाºया नागरीकांचा लोंढा ठाण्यात वाढला आहे. रोजच्या रोज ठाणे स्थानकात हजारो प्रवासी येत आहेत. त्यांची स्थानकाबाहेरच तपासणी मोहीम महापालिकेच्या माध्यमातून आखण्यात आली आहे. परंतु त्यांच्या संपर्कात आल्याने पालिकेच्या काही अधिकाºयांसह कर्मचाºयांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे : परराज्यातून येणाºया नागरीकांची सध्या ठाणे स्थानकाबाहेर अॅन्टीझेन चाचणी केली जात आहे. रोजच्या रोज एक हजाराहून अधिक नागरीकांची येथे चाचणी केली जात आहे. त्यातील सात टक्के नागरीकांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड होत आहे. परंतु या नागरीकांची तपासणी करीत असतांना आता महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्यासह अन्य पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर आता खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
परतीचा प्रवास करुन ठाणे स्थानकात आजच्या घडीला रोजच्या रोज हजारो नागरीक येत आहेत. या नागरीकांची ठाणे स्थानकातच अॅन्टीझेन चाचणी केली जात आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या टिमसह नौपाडा प्रभाग समितीचे पथक या ठिकाणी सज्ज आहे. रोजच्या रोज येथे १ हजाराहून अधिक नागरीकांची तपासणी केली जात आहे. त्यातून १०० च्या आसपास नागरीक हे कोरोना बाधीत आढळत आहेत. विशेष म्हणजे अनलॉक सुरु झाल्यानंतर परराज्यातून येणाऱ्यांचा लोंढा वाढला आहे. त्यामुळेच ठाण्यात किंवा इतर भागात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. ठाणे स्थानकात सध्या परराज्यातून येणाºया नागरीकांच्या तपासणीसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. काही वेळेस येथे सोशल डिस्टेसींगचे पालनही होतांना दिसत नाही. परंतु यातून एकही प्रवासी चाचणी शिवाय जाता कामा नये यासाठी पालिकेच्या यंत्रणा येथे डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत.
दरम्यान अशाच प्रकारे तपासणी सुरु असतांना येथील काही कोरोना बाधीतांच्या संपर्कात आल्याने महापालिकेचे उपायुक्त, नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त, तसेच नौपाडा प्रभाग समितीमधील इतर अभियंते आणि काही कर्मचाºयांना मागील काही दिवसात कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून, या सर्वांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.