कोरोनाचा सर्व्हे करतांना पालिकेने शोधले इतर आजारांचे तब्बल ६८ हजार ४० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:21 AM2020-10-08T11:21:51+5:302020-10-08T11:23:57+5:30

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सध्या शहरात सर्व्हे सुरु आहे. हा सर्व्हे सुरु असतांना पालिकेने मागील २० दिवसात इतर आजारांचे तब्बल ६८ हजार ०४० इतर आजारांचे रुग्ण शोधले आहेत. त्यांच्यावर देखील योग्य उपचार करण्याचे कामही पालिकेने हाती घेतले आहे.

While surveying the corona, the municipality found 68 thousand 40 patients with other diseases | कोरोनाचा सर्व्हे करतांना पालिकेने शोधले इतर आजारांचे तब्बल ६८ हजार ४० रुग्ण

कोरोनाचा सर्व्हे करतांना पालिकेने शोधले इतर आजारांचे तब्बल ६८ हजार ४० रुग्ण

Next

ठाणे : राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या अभियानातंर्गत ठाणे महानगर पालिकेच्या माध्यमातून रोज सरासरी ९० हजार लोकांचे सर्वेक्षण करीत आहे. परंतु हा सर्व्हे करीत असतांनाच पालिकेने मागील २० दिवसात इतर आजारांचे तब्बल ६८ हजार ४० रुग्ण शोधले आहेत. यामध्ये हायपर टेन्शन, मधुमेह, मलेरीया, डेंग्यु आदी महत्वांच्या आजारांबरोबरच इतर आजारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोरोना बाधितांचा शोध घेऊन कोरोनाची साखळी खंडित करणे हा या अभियानाचा हेतू असला तरी ठाणे पालिका केवळ कोरोना रु ग्णालाच आरोग्य सेवा उपलब्ध करून देते असे नाही तर इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रु ग्णांनाही वाऱ्यावर न सोडता त्यांना उपचाराच्या कक्षेत आणण्याचे काम करुन त्यांची काळजी घेत आहे. 
                  कोरोना विषाणुचा संर्सग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागील काही दिवसात नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे २० टक्यांवरुन आता ११ टक्यांवर आले आहे. तर राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे येथील नागरिकांची काळजी घेत आहेत. झिरो मिशन अंतर्गत ठाणे पालिकेने ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे राबविली आहेत. शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याचा सर्व्हे केला आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या अभियानामार्फत रोज सुमारे ९० हजार लोकांचा सर्व्हे करून त्यांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेत आहेत. या सर्व्हेत केवळ कोरोना बधितांचा शोधून काढून त्यांना आरोग्य सेवा दिली जात नाही, तर इतर आजारांकडे देखील लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये मधुमेह, हायपर टेन्शन, डायलेसिस, मलेरिया, डेंग्यू, टीबी, रक्तदाब अशा अनेक गंभीर आजारांसह इतर किरकोळ आजारांबाबतही रु ग्णांना आवश्यक ती मदत केली जात आहे. १८ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबरच्या काळात पालिकेने कोविड व्यतिरिक्त इतर आजारांचे ६८ हजार ०४० रु ग्णांचा शोध घेऊन त्यांना आवश्यक मदत केली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग सुरू असताना केवळ या रु ग्णांकडेच लक्ष न देता पालिका इतर आजारांवर देखील लक्ष देऊन नागरीहिताचे कर्तव्य बजावताना दिसत आहे. इतर आजारांना शोधून काढण्याचे हे प्रमाण १२७९.५९ टक्के आहे. पालिकेची ही कामिगरी नक्कीच कौतुकास्पद असल्याने लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळविले जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
 

Web Title: While surveying the corona, the municipality found 68 thousand 40 patients with other diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.