... तर विकासकांना ५० हजारापर्यंत दंड; महारेराकडून स्पष्टच निर्देश

By सचिन लुंगसे | Published: July 27, 2023 11:48 AM2023-07-27T11:48:18+5:302023-07-27T11:49:15+5:30

पूर्वी रेरा क्रमांक लक्षात ठेवून, महारेराच्या संकेतस्थळावर जाऊन इच्छित प्रकल्पाचा तपशील शोधावा लागायचा

While the developers are fined up to 50 thousand; Clear instructions from Maharera | ... तर विकासकांना ५० हजारापर्यंत दंड; महारेराकडून स्पष्टच निर्देश

... तर विकासकांना ५० हजारापर्यंत दंड; महारेराकडून स्पष्टच निर्देश

googlenewsNext

मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजुला ठळकपणे  क्यूआर कोड छापणे, दाखवणे बंधनकारक असल्याचे महारेराने मे मध्ये जाहीर केलेले आहे. 1 ऑगस्टपासून या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या विकासकांवर  50 हजारापर्यंत दंड ठोठावला जाणार  आहे. त्यानंतर 10 दिवसांत चुकीची दुरूस्ती करून क्यूआर कोड ठळकपणे छापला नाही,  तर "निर्देशांचा सततचा भंग" गृहीत धरून नियमानुसार यथोचित कारवाई केली जाईल.   

पूर्वी रेरा क्रमांक लक्षात ठेवून, महारेराच्या संकेतस्थळावर जाऊन इच्छित प्रकल्पाचा तपशील शोधावा लागायचा. आता काहीही लक्षात न ठेवताच एका क्लिकवर संबंधित प्रकल्पाची माहिती उपलब्ध होणार आहे.ग्राहकांसाठी अत्यंत दूरगामी असलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीत सहकार्य करावे, असे आवाहन महारेराने केले आहे. 

महारेराने मार्च महिन्यात नव्याने नोंदणी करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना क्यूआर कोड द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर विशेष मेहनत घेऊन महारेराने सर्वच नव्या, जुन्या प्रकल्पांना क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आणि आता 1 ऑगस्ट पासून त्याची अंमलबजावणीही सुरू होणार आहे. 

विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पांत जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे,  इलेक्ट्रॉनिक माध्यमे , इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप तत्सम समाज माध्यमे आणि विविध माध्यमांच्या मार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांची जाहिराती करीत असतात. कुठलेही  माध्यम वापरून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये    महारेरा क्रमांक आणि महारेरा संकेतस्थळ छापणे बंधनकारक आहेच. त्या सोबतच आता 1 ऑगस्ट पासून क्यूआर कोडही ठळकपणे  दर्शवणे, छापणे बंधनकारक  करण्यात आलेले आहे. 

क्यूआर कोड छापणे बंधनकारक झाल्यामुळे घर खरेदीदारांना या प्रकल्पाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सर्व प्राथमिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. घर खरेदीदार किंवा स्थावर संपदा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कुणालाही संबंधित प्रकल्पाबाबत विविध प्रकारची माहिती हवी असते. यात प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, प्रकल्प कधी नोंदवल्या गेला, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत  का ,  प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखडय़ात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का, असा सर्व तपशील या क्यूआर कोडमुळे एका क्लिकवर सहजपणे उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकाला निर्णय घ्यायला मदत होणार आहे.

Web Title: While the developers are fined up to 50 thousand; Clear instructions from Maharera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.