सफेद झूट सा है बडा जीना

By admin | Published: June 15, 2014 01:55 AM2014-06-15T01:55:23+5:302014-06-15T01:55:23+5:30

आज अदनान मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या एका अनोख्या धाब्यावर घेऊन आला. रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते

White jhoot is a bit bigger | सफेद झूट सा है बडा जीना

सफेद झूट सा है बडा जीना

Next

आज अदनान मुंबई-अहमदाबाद महामार्गावरच्या एका अनोख्या धाब्यावर घेऊन आला. रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. धाब्याबाहेरच्या प्रशस्त पटांगणात एकामागून एक इम्पोर्टेड गाड्या पार्क होतच होत्या. त्यातून उतरता अवघा उतावळा उन्माद, एकेक करत आपापल्या पूर्वारक्षित तंबूत घुसायच्या घाईत. कुणा धनिकाबरोबर आलेल्या त्यातल्याही एका ललनेनं अदनानला हाय केलं. तिच्या जोडीदाराशी त्याची ओळख करून दिली. अब्रार. इम्पोर्टएक्स्पोर्टचा बिझनेस आहे. पर्मनंट कस्टमर. एकदम दिलदार. महिन्यातून दोनदा आम्ही भेटतोच. एकमेकाला पसंत करतो. बाय हार्ट. पण कोणतं बंधन नाही कोणावर. अब्रार आला की, मी त्याची. इथून अब्रारच्या कुलाब्यातल्या फ्लॅटवर जाणार. आज आणि उद्या धम्माल. अब्रारनं आम्हाला डीनरचा आग्रह केला. अदनान लगेच हो म्हणाला.
आता अब्रार बोलत होता. मी मुंबईत जन्मलो. मोठी फॅमिली आणि कारोबार आहे. माझ्यापुरतंच बोलू या. माझ्या दोन मुली परदेशात शिकताहेत. बायको मात्र मला सोडून माझ्याच सावत्र भावाबरोबर राहते. त्याच्याशी का, काय, किती आणि कसा भांडू? मी धार्मिक आहे. पण, माणूस आहे. पुरु ष आहे. अंग मोडून, पुरी सच्चाईसे मेहनत करतो. पैसा आहे. एका पार्टीत हिची ओळख झाली. आवडली. यायला लागलो. पण, इथं पण मी इमान ठेवलं आहे. फक्त अमिताबरोबरच संबंध आहेत. सुकून मिळतो. मी तिचा नवरा नाही. फेअर रिलेशनशिप. मोठी दुनिया बघितली. बघतो. पाप, पुण्य, सच, झूट हे सगळं ज्याचं तो आणि ज्याच्या त्याच्या पुरतं ठरवतो. मला प्रोफेसर व्हायचं होतं. कबाडी झालो. चार लाइने सुनाता हूं. अर्ज है...
सफेद झूट सा है बडा जीना
अपने आप पर ही लूटते रहना
अहमियत, अरमानोंको संवरते
बना है इन्सान बाज़ारी गहेना।
रात्रीची मुंबई हा आमच्यासारख्या दिलजल्यांचा मोठा आधार आहे. सब घोडे बारा टक्के नाहीत. मला माहिती आहे की, माझ्या अशा या काहीशा विचित्र वागण्याचं समर्थनच करतो आहे. मात्र, मला हे सगळं बाहेरख्याली वाटत नाही. अरे, आपल्या प्रत्येकाला रोज स्वत:ला विकावं लागतं. प्रत्येकाची सुरुवात स्वत:च्या घरापासूनच. टॉलरेट करू शकतो तोपर्यंत आपण सगळेच शक्यतो कुटुंबवत्सल. ही फॅक्ट आहे. किती घटस्फोट होतात, किती रेप होतात रोज? बाप आणि पोरीचं नातं किती राहिलंय आज? लिव्ह इन रिलेशनशिप किती वाढलीय आज? याचा अर्थ सगळंच वाईट आहे, असा नाही. प्रामाणिकपणे संसार करणारे पण खूप लोक आहेतच की. आम्ही आदर करतो त्यांचा. त्यांच्यामुळे जग टिकून आहे. मान्य आहे. पण, आमच्यासारखे लोक पण काय जग बुडवायला नाही निघालेले. आम्ही उलट आमच्या दुखण्याचा बाऊ करत नाही. तडजोड स्वीकारतो. मन रमवतो. या अमितासारख्या मुलींना खरंच यात मोठं क्रेडिट जातं. पण, ह्यांची हेटाळणी होते. तिकडं पायाशी सगळं सुख होतं. दोन मुली झाल्यावर मला माझी रीतसर बायको सोडून गेली. शॉक लागला. त्यानंतर मी एका मोटार अपघातातून वाचलो. लाइफ कळून गेलं. अर्ज है..
मौत को छू के आया हुँ
मसीहा देख आया हुँ
दिल की दौलत बने बदन की
पहचान परख आया हुँ।
अमितानं अब्रारचा हात हातात घेतला. नुकतंच लग्न लागून हनिमूनला निघालेलं रोमांचित कपल. अदनाननं अमिताच्या डोक्यावरून बापमायेनं हात फिरवला. डोळे कोरडे केले. म्हणाला,
मोहब्बत ही है इक चीज़ ऐसी
जो ना बेची, ना है खरीदी जाती
है अहसास अपनापन ये पनपता
बिना आँगन भी बने दिल जो है तडपता।

Web Title: White jhoot is a bit bigger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.