भायखळ्याच्या राणीच्या बागेत येणार पांढरा सिंह, जॅग्वार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 05:26 AM2021-02-04T05:26:39+5:302021-02-04T05:27:07+5:30

mumbai News : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात विदेशी प्राण्यांचे अधिवास तयार करण्यात येणार आहे.

A white lion, a jaguar, will come to the garden of the queen of Byculla | भायखळ्याच्या राणीच्या बागेत येणार पांढरा सिंह, जॅग्वार

भायखळ्याच्या राणीच्या बागेत येणार पांढरा सिंह, जॅग्वार

googlenewsNext

मुंबई :  भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात विदेशी प्राण्यांचे अधिवास तयार करण्यात येणार आहे. जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह, जॅग्वार या प्राण्यांकरिता प्रदर्शनी तयार करण्यात येणार आहे. विविध कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत. राणीची बाग अधिकाधिक आखीव रेखीव करण्यात येणार आहे. याकरिता ४९.६७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पाणमांजर, लांडगा, सांबर, कांकर, नीलगाय, चौशिंगा यांच्या पिंजऱ्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मार्च २०२१ पर्यंत ते पूर्ण होईल. येथे संकल्प उद्यान विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथील इंटरप्रिटेशन सेंटरच्या इमारतीमध्ये मुंबईतील विविध दर्शनीय ठिकाणे दर्शविणारी नवीन सुविधा 
विकसित करण्यात येत असून, विविध ठिकाणी आभासी फेरफटका मारता येईल.

वरळी, विक्रोळी, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम, मालाड, दहिसर येथील जलतरण तलाव बांधण्याची आणि संकुल उभारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.  यासाठी २० कोटी तरतूद आहे. दादर येथील जगन्नाथ शंकरशेठ फ्लायओव्हर खालील प्रस्तावित जागेचे सुशोभिकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. सांताक्रूझ, वांद्रे, विक्रोळी, भांडूप, ओशिवरा, कांदिवली पूर्व, कुर्ला येथील उद्यानांच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, काम पूर्ण झाल्यानंतर ही उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात येतील.

परळ, सायन कोळीवाडा, मालाड, पोईसर, कांदिवली, माटुंगा, कुर्ला, वांद्रे आणि घाटकोपर येथील मैदानांच्या विकासकामास सुरुवात करण्यात आली असून, ५३.२७ कोटी तरतूद करण्यात आली आहे. शिवाय नागरी वनीकरणामध्ये वाढ करण्यात येणार असून, २०.१५ कोटींची तरतूद आहे. एकूण १२६.५३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पिंजऱ्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात
पाणमांजर, लांडगा, सांबर, कांकर, नीलगाय, चौशिंगा यांच्या पिंजऱ्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मार्च २०२१ पर्यंत ते पूर्ण होईल. येथे 
संकल्प उद्यान विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही बाग अधिक आखीवरेखीव होइल.

Web Title: A white lion, a jaguar, will come to the garden of the queen of Byculla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई