नवी मुंबई : मुलीसोबत दोन दिवस व्हॉट्सअपवर चॅटिंगद्वारे ओळख वाढवून २८ वर्षीय तरुणीला लग्नाच्या आमिषाने भेटायला बोलावून लुटल्याची घटना वाशी येथे घडली आहे. जुबेर या तरुणाने कुर्ला येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीचा मोबाईल नंबर मिळवला होता. २४ फेब्रुवारी रोजी जुबेर याने सदर तरुणीला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला होता. यावेळी तरुणीने देखील ओळख नसतानाही त्याला प्रतिसाद दिला. यादरम्यान त्यांनी एकमेकांना स्वत:चे फोटो देखील पाठवले होते. त्यानंतर काही तास चॅटिंग केल्यानंतर जुबेर याने मुलीला लग्नाची मागणी घातली.थोडा विश्वास मिळवल्यानंतर जुबेरने या तरुणीला वाशीतील रघुलीला मॉल येथे भेटायला बोलावले होते. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी ६ वाजता ही तरुणी तेथे आलेली. यावेळी जुबेर याने तिच्यासोबत गप्पा मारत गळ्यातील सोन्याची चेन व मोबाईलचे कौतुक करत ते पाहण्यासाठी स्वत:कडे घेतले. मात्र हा ऐवज परत न देता. सीवूड येथे पोचल्यावर त्याने पेपर घेऊन येतो, असे सांगून तरुणीला थांबवून पळ काढला. या प्रकारात सदर तरुणीचा १३ हजारांचा ऐवज चोरला. (प्रतिनिधी)
व्हॉट्सअपवरील ओळख पडली महागात
By admin | Published: February 27, 2015 1:19 AM