पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी?
By admin | Published: January 1, 2016 02:24 AM2016-01-01T02:24:37+5:302016-01-01T02:24:37+5:30
मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून यापूर्वीच नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे. तथापि, त्यांना पदमुक्त करण्यासाठी केंद्राच्या गृह खात्याने महाराष्ट्र
- डिप्पी वांकाणी, मुंबई
मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून यापूर्वीच नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे. तथापि, त्यांना पदमुक्त करण्यासाठी केंद्राच्या गृह खात्याने महाराष्ट्र सरकारला अद्याप अधिकृत पत्रच दिलेले नाही. तरीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता कोण येणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दस्तऐवज व इतर कामांसाठी जावेद यांच्या प्रत्यक्ष नियुक्तीला आणखी एक महिन्याचा कालावधी
लागू शकतो. आयुक्त अहमद जावेद हे सध्या उमंग या पोलिसांसाठीच्या बॉलीवूड कलाकारांच्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त
आहेत. त्यानंतरच ते नवीन
जबाबदारी स्वीकारतील, असा असा कयास आहे.
पंतप्रधानांनी नव्या नियुक्तीला मान्यता दिल्यानंतर जावेद यांच्या सौदीतील राजदूत पदाबाबतची घोषणा परराष्ट्र व्यवहार
मंत्रालयाने केली. गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकार त्यांना
कधी रिलिव्ह करायचे याचा निर्णय घेईल. जावेद यांना रिलिव्ह करण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सूचना प्राप्त झाली काय, यावर अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी ‘अद्याप नाही’, एवढेच उत्तर दिले.
कोण आहेत दावेदार?
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी अनेक दावेदार आहेत. १९८२ च्या आयपीएस बॅचचे दत्ता पडसळगीकर हे सध्या आयबीचे विशेष संचालक आहेत. १९८७ च्या बॅचचे संजय बर्वे हे सध्या लाचलुचपत विभागाचे अतिरिक्त महासंचालक आहेत. हे दोघे प्रमुख दावेदार समजले जात आहेत. तर पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक सतीश माथूर व मीरा बोरवणकर यांचाही विचार होऊ शकतो.