गर्दीमागचा ‘कर्ता’ कोण? ‘ते’ सर्व वांद्रे परिसरात राहणारेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 02:35 AM2020-04-16T02:35:41+5:302020-04-16T02:36:07+5:30

लॉकडाउनच्या काळात आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुरू होती. त्यामुळे एका ठिकाणी अडकलेले प्रवासी १५ एप्रिलपासूनचे रेल्वे तिकीट बुकिंग करीत होते

Who is the 'doer' behind the crowd? | गर्दीमागचा ‘कर्ता’ कोण? ‘ते’ सर्व वांद्रे परिसरात राहणारेच!

गर्दीमागचा ‘कर्ता’ कोण? ‘ते’ सर्व वांद्रे परिसरात राहणारेच!

Next

‘ते’ सर्व वांद्रे परिसरात राहणारेच!
वांद्रे परिसरात मंगळवारी जमलेले मजूर वांद्रे पूर्वच्या बेहरामपाडा परिसरातील असल्याची माहिती पुढे आली आहे. बेहरामपाड्यात झोपडपट्टीमध्ये एक एक खोली चार ते पाच मजली आहे. तेथे राहणारे हे सर्व मजूर उत्तर भारतीय असून मूळचे झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमधील आहेत. तसेच कोरोना थैमान घालत असताना आपला माणूस लांब असून त्याचे काही बरेवाईट होण्याची भीती गावात असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना सतावू लागली. यामुळे हे मजूर तणावात गेले होते. त्यामुळे वांद्रे येथून घरी जाण्यासाठी गाडी मिळेल याच आशेने हे लोक वांद्रे स्थानकावर जमा झाले.

तिकीट बुकिंगमुळे उडाला गोंधळ
मुंबई : लॉकडाउनच्या काळात आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुरू होती. त्यामुळे एका ठिकाणी अडकलेले प्रवासी १५ एप्रिलपासूनचे रेल्वे तिकीट बुकिंग करीत होते. मात्र ३ मेपर्यंत रेल्वे बंद करण्याची घोषणा झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. परिणामी, आयआरसीटीसीकडून पुढील घोषणेपर्यंत तिकीट बुकिंग केली जाणार नाही; यासह तत्काळ तिकीटदेखील रद्द केले. मात्र यापूर्वी काढण्यात आलेली सर्व तिकिटे रद्द करून तिकिटांचा परतावा देण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

स्थलांतरितांना मिळते दोन वेळचे अन्न
मुंबई : लॉकडाउनमध्ये उपासमार होत असल्याने वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात स्थलांतरित मजुरांचा जमाव एकत्रित आला होता. मात्र शास्त्रीनगर व महाराष्ट्रनगर परिसरात सुमारे तीन हजार स्थलांतरित लोकांना २८ मार्चपासून दररोज दोन्ही वेळचे जेवण पुरविले जात आहे. तर मंगळवारच्या घटनेनंतर दीड हजार रेशन किट वितरित करण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. एच/पश्चिम विभागामार्फत शास्त्रीनगर व महाराष्ट्रनगर परिसरात स्थलांतरित मजुरांना लोकप्रतिनिधी, नगरसेवक, अशासकीय संस्था यांच्या मदतीने दोन वेळेचे अन्न दिले जात आहे.
 

Web Title: Who is the 'doer' behind the crowd?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.