Join us

नेमके कोण कोणासोबत?; शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या NCP नेत्यांची नावे पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 6:37 AM

विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरही अजित पवारांबरोबर आहेत.

राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते आणि आमदार रविवारी राजभवनवर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी शपथ घेतली. 

पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खा. अमोल कोल्हे, खजिनदार सुनील तटकरे तसेच विधानसभेच्या आमदारांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, नीलेश लंके, अतुल बेनके, संग्राम जगताप, सुनील टिंगरे, किरण लहामटे, अशोक पवार, सरोज अहिर, शेखर निकम, दौलत दरोडा, सुनिल शेळके, दीपक चव्हाण, दत्ता भरणे उपस्थित होते. विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरही अजित पवारांबरोबर आहेत.

हे होते अनुपस्थित

‘मी साहेबांबरोबर...’ असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांबरोबर न गेलेल्या नेत्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता. शपधविधी सोहळ्यात किंवा पवारांनी ‘देवगिरी’ बंगल्यावर बोलावलेल्या बैठकीला उपस्थित नसलेल्या आमदारांमध्ये राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, इंद्रनील नाईक, चंद्रकांत नवघरे, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील भुसारा, दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे, चेतन तुपे, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, प्रकाश सोळंखे, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, बबन शिंदे, यशवंत माने, मकरंद जाधव, राजेश पाटील, मानसिंग नाईक, सुमनताई पाटील यांचा समावेश. नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. अनुपस्थित असलेले किती आमदार अजित पवारांबरोबर जायला तयार आहेत, हे कळू शकलेले नाही.  येत्या एक-दोन दिवसात त्याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस