Join us  

अपक्षांच्या मतविभाजनाचा फायदा कोणाला?

By admin | Published: October 13, 2014 12:56 AM

2004 चा पराभव वगळता 1995 ते 2009 या काळात सातत्याने विधानसभेत शहापूर मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी सेनेच्या दौलत दरोडा यांना मिळाली.

भरत उबाळे, शहापूर2004 चा पराभव वगळता 1995 ते 2009 या काळात सातत्याने विधानसभेत शहापूर मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी सेनेच्या दौलत दरोडा यांना मिळाली. मात्र, यावेळच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, मनसे, कम्युनिस्ट पक्षासह सर्व पक्षीयांनी कडवी लढत उभी केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ही जागा राखण्याचे मोठेच आव्हान शिवसेनेसमोर निर्माण झाले आहे. यात अपक्षांच्या मतविभाजनाचा फायदा कोण उठवते यावरच येथील निर्णय ठरणार आहे.शिवसेनेचे दौलत दरोडा सलग पाचव्यांदा येथून निवडणूक लढत आहेत. पंचरंगी लढतीमुळे मत विभागणीचे तसेच वाढलेल्या उमेदवारांचे त्यांना आव्हान आहे. सेनेनंतर दुसऱ्या क्र मांकाचा पक्ष म्हणून आपणच बाजी मारु असे राष्ट्रवादीला वाटत असले तरी इतर पक्षांच्या आव्हानाला, मतांच्या विभाजनाला देखिल त्यांना सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसने या मतदारसंघातल्या पारंपारीक मतदाराला जवळ ओढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तर भाजपाने तीन मिहन्यांपूर्वी लोकसभा निवडणूकीवेळी येथे मिळविलेल्या मतांच्या आघाडीवर डोळा ठेवला आहे. मनसेचे प्रमुख तालुका नेते सोडून गेल्यावरही व तालुका कमिटी मोडकळीस येऊनही उमेदवार ज्ञानेश्वर तळपाडे यांनी प्रचाराची मोहीम एकहाती शिरावर घेतली आहे. पक्षातील कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याने थांबलेला प्रचार पुन्हा सुरु झाला आहे. कम्युनिस्ट पार्टीने दुर्गम, ग्रामीण, आदिवासी मतांवरच लक्ष केंद्रित केले आहे.