गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत सर्वाधिक आमदार कुणाचे? जिल्ह्यासह उपनगरांत ३६ आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 01:05 PM2024-10-15T13:05:31+5:302024-10-15T13:06:09+5:30
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद झाले. त्यामुळे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.
मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यात १० आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ असे मिळून मुंबईमध्ये एकूण ३६ आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांत शिवसेना ४, भाजप ४ आणि काँग्रेसचे २ आमदार निवडून आले होते. तर, उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघांत भाजपचे १२, शिवसेना १०, काँग्रेस २ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा प्रत्येकी १ आमदार निवडून आला होता.
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद झाले. त्यामुळे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.
शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीमधील अजित पवार यांनी बंड करून भाजपसोबत महायुती करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे सध्या मुंबईत दोन्ही जिल्ह्यांत मिळून भाजपचे १६, काँग्रेसचे ४, उद्धवसेना ८, शिंदेसेना ६, राष्ट्रवादी (अजितदादा गट) १ आणि समाजवादी पक्ष १ असे संख्याबळ आहे.
मुंबई शहर जिल्हा
विधानसभा विजयी उमेदवार पक्ष
कुलाबा राहुल नार्वेकर भाजप
मलबार हिल मंगल प्रभात लोढा भाजप
वडाळा कालिदास कोळंबकर भाजप
सायन कोळीवाडा कॅप्टन तमीळ सेल्वन भाजप
भायखळा यामिनी जाधव शिंदेसेना
माहीम सदा सरवणकर शिंदेसेना
शिवडी अजय चौधरी उद्धवसेना
वरळी आदित्य ठाकरे उद्धवसेना
मुंबादेवी अमीन पटेल काँग्रेस
धारावी वर्षा गायकवाड काँग्रेस
(सध्या लोकसभेवर)
मुंबई उपनगर जिल्हा
विधानसभा विजयी उमेदवार पक्ष
घाटकोपर (पू.) पराग शाह भाजप
घाटकोपर (प.) राम कदम भाजप
मुलुंड मिहीर कोटेचा भाजप
वांद्रे (प.) आशिष शेलार भाजप
विलेपार्ले पराग अळवणी भाजप
अंधेरी (प.) अमित साटम भाजप
वर्सोवा भारती लव्हेकर भाजप
गोरेगाव विद्या ठाकूर भाजप
चारकोप योगेश सागर भाजप
कांदिवली अतुल भातखळकर भाजप
दहिसर मनीषा चौधरी भाजप
बोरीवली सुनील राणे भाजप
कुर्ला मंगेश कुडाळकर शिंदेसेना
चांदिवली दिलीप लांडे शिंदेसेना
मागाठाणे प्रकाश सुर्वे शिंदेसेना
जोगेश्वरी रवींद्र वायकर शिंदेसेना
(सध्या लोकसभेवर)
चेंबूर प्रकाश फातर्फेकर उद्धवसेना
भांडुप रमेश कोरगावकर उद्धवसेना
विक्रोळी सुनील राऊत उद्धवसेना
कालीना संजय पोतनीस उद्धवसेना
अंधेरी (पू.) ऋतुजा रमेश लटके उद्धवसेना
दिंडोशी सुनील प्रभू उद्धवसेना
वांद्रे (पू.) झिशान सिद्दिकी काँग्रेस
मालाड (प.) अस्लम शेख काँग्रेस
अणुशक्ती नगर नवाब मलिक राष्ट्रवादी -
अजितदादा गट
मानखुर्द अबू आझमी समाजवादी पार्टी